Shahrukh Khan Nayanthara Vignesh : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा सोशल मीडियावर चांगचाल चर्चेत राहतो. मात्र, सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे त्याचा 'जवान' हा चित्रपट आहे. 'जवान' या चित्रपटात शाहरुख खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. नयनतारा आणि शाहरुखची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यांची जोडी ही चर्चेत असताना शाहरुख खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नयनताराचा पती विग्नेश शिवनला एक वॉर्निंग दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विग्नेश शिवननं त्याची पत्नी नयनतारासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत विग्नेशनं तिला जवानसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तो म्हणाला होता की "अॅटलीवर कोणाला गर्व का नसू शकतो, जेव्हा तो त्याच्या बॉलिवूड डेब्यूमध्ये इतकं चांगलं काम करत आहे. जे पाहून हा आंतरराष्ट्रीय चित्रपट वाटत आहे. खूप मेहनत, धैर्य आणि प्रयत्न अशा सगळ्यांमुळे हा चित्रपट बनला आहे. तर शाहरुखसोबत ड्रीम डेब्यू करण्यासाठी नयनताराला खूप खूप शुभेच्छा. माझा किंग अनिरुद्धनं कमाल केली. विजय सेतुपति सर वाह."



विग्रेशच्या या ट्वीटवर कमेंट करत शाहरुख म्हणाला, "विग्नेश शिवन तू दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. नयनतारा अप्रतिम आहे. पण, मी हे कोणाला सांगतोय... तुम्हाला तर हे आधीपासून माहित आहेच. पण पतीदेव सावधान रहा, जवानच्या सेटवर ती खूप सारे किक्स आणि पंचेस शिकली आहे."



शाहरुखच्या या ट्वीटवर उत्तर देत विग्नेश म्हणाला की मी काळजी घेत आहे. पण चित्रपटात अॅक्शन करण्यासोबत तिनं तुझ्यासोबत रोमान्स देखील केला आहे. किंग ऑफ रोमान्ससही  तिनं रोमान्स केला. त्या दोघांच्या या पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. 


हेही वाचा : Mouni Roy चा विमानतळाच्या दारातच उडाला गोंधळ; 'या' कारणामुळे विमानतळावर नो एन्ट्री


जवान या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुनील ग्रोव्हर, प्रियामणि आणि विजय सेतुपति देखील दिसणार आहेत. या कलाकारांच्या व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्या देखील भूमिका असणार आहेत. तर दीपिका पदुकोण आणि संजय दत्त हे दोघे हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या प्रीव्ह्यूनं सगळ्यांना आश्चर्य झाले असून प्रेक्षक चित्रपट प्रदर्शनाची प्रतिक्षा करत आहेत.