सेलिब्रिटींना नजर का नाही लागत? लढवतात ही युक्ती... आता किंग खानही सहभागी
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत.
मुंबई : दररोज शेकडो लोकांना भेटणारे आणि हजारो लोकांच्या समोरून जाणाऱ्या सेलिब्रिटींनाही असते नजर लागण्याची भीती. त्यामुळे तेही या सगळ्यापासून स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करतात. अनेक सेलिब्रिटी पूजा-पाठ आणि तंत्र-मंत्र करतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर आणि उपायांवर विश्वास असतो. गेल्या काही वर्षांत बॉलिवूड स्टार्सचा 'इव्हिल आय'वरील विश्वास झपाट्याने वाढला आहे. अनेकदा तुम्ही अनेक स्टार्सना त्यांच्या गळ्यात हा 'इव्हिल आय' घातलेला पाहिला असेल, अनेकांना ते हातात काळ्या धाग्यानं बांधलेलं आढळेल. 'इव्हिल आय'चा (Evil Eye) उपोयग सेलिब्रिटी एक फॅशन म्हणूनही करतात.
बॉलिवूडमधील अनेक स्टार्स 'इव्हिल आय' वापरत आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत, प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra), बिपाशा बासू (Bipasha Basu), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), कतरिना कैफ (Katrina Kaif), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ते नव्या पिढीतील सारा अली खान (Sara Ali Khan), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) 'इव्हिल आय' वेगवेगळ्या प्रकारे परिधान करतात. आता या यादीत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचाही समावेष झाला आहे. यावर्षी ईदच्या दिवशी काही परदेशी पाहुण्यांसोबत मन्नतमध्ये क्लिक केलेल्या फोटोंमध्ये शाहरुखनं डाव्या हाताच्या मनगटावर 'इव्हिल आय' ब्रेसलेट घातल्याचे दिसते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून शाहरुख मुलगा आर्यनमुळे एका कठीण काळातून जात होता. त्याशिवाय पुढच्या वर्षी शाहरुखचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गेल्या काही वर्षांत त्याच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस आलेख घसरल्याने करिअरची चिंताही त्याला सतावत आहे. त्याचा शेवटचा सुपरहिट चित्रपट 2014 मधला 'हॅप्पी न्यू इयर' होता. यानंतर त्यांचे 'दिलवाले', 'डिअर जिंदगी' आणि 'रईस' हे चित्रपट काही चांगली कामगिरी करू शकले नाही. तर 'जब हॅरी मॅट सेजल' फ्लॉप ठरला. शाहरुखचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'झिरो' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. 2018 नंतर चार वर्षे निघून गेले, जेव्हा शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, दरम्यान 2023 हे वर्ष शाहरुखच्या करिअरसाठी कसं असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Shahrukh Khan Is Using Evil Eye For Upcoming Movie Career Suhana Aryan Abram Gauri)
दरम्यान, प्रत्येक धर्म आणि संस्कृतीत, नजर लागण्याविषयी म्हटले जाते आणि त्यांच्याशी लढण्यासाठी उपाय देखील करण्यात येतात जातात. पण 'इव्हिल आय' चे चिन्ह ग्रीक पुराणकथांमधून आलं आहे आणि अलीकडच्या काळात ते जगभर लोकप्रिय झाले आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडपासून जगभरातील सेलिब्रिटी, खेळाडू आणि नेते यावर विश्वास ठेवतात आणि लॉकेट किंवा ब्रेसलेटमध्ये 'इव्हिल आय' घालतात.