Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप या गाण्यातील या दृश्यांमुळे झाला होता. परंतु या वादाचा एकप्रकारे पठाण या चित्रपटाला फायदाच झाल्याचं पाहायला मिळत आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या चित्रपटानं अल्पावधीचं आणि खासकरून बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्याच्या वादानंतर दहा कोटी व्ह्यूजचा आकाडा पार केला होता. आता काहीश्या वादांगमध्ये अकडकलेल्या या चित्रपटानं प्रदर्शनाआधीच रग्गड कमाई केली आहे. हा आकाडा वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील. या चित्रपटानं आत्तापर्यंत कोट्यवधींची कमाई केली असून या चित्रपटाचे ओटीटी राईट्स (Ott Rights) विकले गेले असल्याची माहिती कळते आहे. (Shahrukh khan Pathaan earned more than 150 crores before his exhibition, despite the controversy The number will surprise you)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही ठिकाणी या चित्रपटाला इतका विरोध मिळाला की या विरोधाची चर्चाच जास्त होत राहिली. त्यातून या चित्रपटाचा वादही इतका विकोपा गेला की पठाण चित्रपटाचे अनेकांनी पोस्टर्सही जाळले. शाहरूख खान आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. अगदी माय नेम इज खानपासून ते पठाणपर्यंत शाहरूख खानचे (Shah Rukh Khan Movie Controversy) अनेक चित्रपट हे वादग्रस्त राहिले आहेत. सध्या मीडिया रिपोर्ट्सनुसार अशी बातमी आली आहे की शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकले गेले आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहानंतर प्रेक्षक ओटीटीवरही पाहू शकतील. 


हेही वाचा - Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल


इतक्या कोटींना विकले गेले राईट्स


गेल्या महिन्याभरापासून शाहरूख खानचा पठाण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाहरूखच्या या अवेडेट सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शाहरूखचे चाहते हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याची वाट बघत आहेत. परंतु त्याच्या चाहत्यांसाठी आता अजून एक आनंदाची बातमी आहे. पठाण हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमनं विकत घेतल्याची बातमी येते आहे. या चित्रपटाचे हक्क ओटीटीला 100 कोटी रूपयांना विकले गेले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईमचा (Amazon Prime) हा करार शनिवारी निश्चित झाल्याचे समजते आहे. पण हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलिज होईल याची अद्यापही माहिती आली नाही. हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्चला किंवा एप्रिलला प्रदर्शित होऊ शकतो.  


या चित्रपटाची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटातून शाहरूख खान, दीपिका पादूकोण आणि जॉन इब्राहम मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. तर जॉन इब्राहम हा खलनायकाच्या भुमिेकतून दिसणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर शाहरूख खान रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.  2018 मध्ये 'झिरो' या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता.