मुंबई : अभिनेता शाहरूख खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. बादशाह म्हटल्या जाणार्‍या अभिनेता शाहरूख खानच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख आणि गौरीचे नाव आज इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या कपल्समध्ये घेतले जाते. शाहरुख खान मुस्लिम आहेत तर गौरी हिंदू आहे. मात्र, किंग खानच्या म्हणण्यानुसार तो आपल्या मुलांना  आधी ते भारतीय आहेत असा सल्ला देतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका डान्स शो दरम्यान शाहरूखने त्यांच्या मुलांच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केला. शाहरूख म्हणाला, 'माझी पत्नी हिंदू आहे. मी मुसलमान  आहे आणि आमची मुलं हिंदूस्तान आहेत...' यामुळेचं किंग खानच्या घरी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.


अनेकदा शाहरुख आणि गौरीच्या मुलांची कुठल्या धर्मावर जास्त श्रद्धा आहे, असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो. एकदा एका मुलाखतीत गौरी खानलाही याबाबत विचारण्यात आलं होतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रश्नाचं उत्तर देताना गैरी म्हणाली, 'आर्यनवर त्याचे वडील शाहरुख खान यांचा खूप प्रभाव आहे आणि तो स्वत:ला मुस्लिम समजतो'. गौरीच्या म्हणण्यानुसार, आर्यनने स्वतःला मुस्लीम समजत असल्याचे कबूल केले आहे. 


स्वत: हिंदू आणि शाहरुख मुस्लिम असल्याच्या प्रश्नावर गौरीही मोकळेपणाने बोलली. गौरी म्हणते, 'मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ असा नाही की मी त्याचा धर्म स्वीकारावा, शाहरुख खानही या गोष्टीची काळजी घेतो'.