`प्रचंड दुःख होतं जेव्हा...`, `त्या` कारणामुळे Shahrukh Khan बंद खोलीत मुलांसोबत ढसाढसा रडला
Shahrukh Khan नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. दरम्यान, लवकरच शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shahrukh Khan Cried With His Childrens in Hotel Room : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख सध्या 'पठाण' (Pathaan) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरुखचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनेच्या लोकांनी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तरी सुद्धा शाहरुख न घाबरत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खाननं त्याच्या एका मोठ्या घटनेविषयी सांगतले, जे ऐकून त्याचे चाहतेही दु: खी झाले होते.
शाहरुखनं 2014 मध्ये आलेल्या एका सगळ्यात मोठ्या वाईट घटनेविषयी सांगितले. शाहरुख म्हणाला की IPL मॅच दरम्यान, तो एका हॉटेलमध्ये त्याची दोन्ही मुलं आर्यन आणि सुहानासोबत थांबला होता. आता याचे कारण काय असेल असा प्रश्न अनेकांना आहे.
हेही वाचा : Govinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार!
शाहरुख पुढे म्हणाला, 'जेव्हा क्रिकेट सामने भारतात होऊ लागले, आमची टीम केकेआरनं सर्व सामने जिंकण्यास सुरुवात झाली आणि आम्ही 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफीही जिंकली. शाहरुख म्हणाला, कोणी दाखवो किंवा न दाखवो, पण जेव्हा टीम हरते तेव्हा खूप त्रास होतो. काहीही बोला दु: ख तर होतच. कोणी कितीही समजावले तरी असं वाटतं की असं होतं तसं होतं, जेव्हा हरतो तेव्हा मुळीच चांगलं वाटत नाही.'
शाहरुखच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढच्या वर्षी शाहरुखचे अनेक चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावरून वाद सुरु झाला आहे. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या बिकीनी लूकवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी वादग्रस्त धमकी देण्यात आलीय. अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी ही वादग्रस्त धमकी दिलीय. पठाण चित्रपटातल्या दीपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद काही थांबताना दिसत नाही.. आता परमहंस आचार्य यांनी शाहरुख खानलाच धमकी दिलीय. आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला जिहादी शाहरुख खान मिळाला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन अशी वादग्रस्त धमकी परमहंस यांनी दिलीय. एवढंच नाही, तर ही एक रणनीती असून हिंदूंच्या भावना आणि पैसे कमविण्याचा धंदा असल्याचा आरोप देखील परमहंस आचार्य यांनी किंग खानवर केला आहे.