शाहरुख खानने पहिल्यांदाच सांगितला `डंकी`चा खरा अर्थ, तुम्हाला माहिती होता का?
अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा `डंकी` या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अभिनेत्याने ११ डिसेंबरला या सिनेमातील `ओ माही` या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. एका प्रमोशनल व्हिडीओसोबत शाहरुखने या सिनेमाचा अर्थही सांगितला आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'डंकी' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अभिनेत्याने ११ डिसेंबरला या सिनेमातील 'ओ माही' या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. एका प्रमोशनल व्हिडीओसोबत शाहरुखने या सिनेमाचा अर्थही सांगितला आहे. शाहरुखचा 'पठाण' आणि 'जवान'नंतर 'डंकी' हा तिसरा थियेट्रिकल रिलीज आहे.
'डंकी'मधील 'ओ माही' हे गाणं लवकरच होणार रिलीज
'डंकी ड्रॉप 5' टाइटल से 'लुट्ट पुट गया' आणि 'निकले थे कभी हम घर से' के बाद' यानंतर आता 'ओ माही' हे या सिनेमातील तिसरं गाणं सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्याचं टीझर शेअर करत शाहरुख खानने लिहीलं, "कारण प्रत्येकजण विचारतोय की डंकी म्हणजे नक्की काय? डिंकी म्हणजे आपल्या जवळच्या लोकांपासून वेगळं होणे आणि जेव्हा आपण त्यांच्यासोबत असतो तेव्हा असे वाटतं की हा क्षण आयुष्याच्या शेवटपर्यंत संपू नये म्हणजेच 'डंकी'."
शाहरुख खानसोबत 'डंकी' या सिनेमामध्ये बोमन इराणी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर हे कलाकार दिसणार आहेत. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली आहे. 'डंकी' या सिनेमाची कथा अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिली आहे.' जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्सचा डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.
शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटात चार मित्रांची एक गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्या चौघांचं इंग्लंडला जाण्याचं स्वप्ना असतं. परदेशात जाण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. शाहरुख खान त्याच्या या चार मित्रांना लंडनला जाण्यासाठी मदत करण्याची सगळी जबाबदारी घेतो. डंकी या चित्रपटात प्रेम आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पठाण आणि जवानमध्ये शाहरुखला अॅक्शन करताना पाहिल्यानंतर आता डंकीमध्ये शाहरुखला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटात शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री तापसू पन्नू पाहायला मिळणार आहे. तर तिच्याशिवाय या चित्रपटात दीया मिर्जा, धर्मेंद्र, बोमन ईरानी, सतीश शाह हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या एका वर्षात शाहरुखचे पठाण, जवान हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता डंकी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.