Shahrukh Khan at Vaishno Devi : शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या एका व्हिडीओची. यावेळी तो वैष्णोव देवीला दर्शनासाठी गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी त्याचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहे. 'जवान' हा 7 सप्टेंबरला येतो आहे. त्यातून त्याचा 'पठाण' हा चित्रपट यावर्षी जानेवारीत प्रदर्शित झाला होता. यावेळी त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभला होता. त्यासोबतच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या चित्रपटाला अल्पावधीच मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जगभरात या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी आता त्याच्या 'जवान' या चित्रपटाची जोरात चर्चा असून आता हा चित्रपट येत्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी शाहरूख खान आणि नयनताराची रोमॅण्टिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या वैष्णोव देवीच्या देवदर्शनाची. यामध्ये या व्हिडीओत तो वैष्णवदेवीला रवाना झाल्याची दृश्यं समोर येताना दिसत आहेत. यावेळी sonuK57 या एका ट्विटर युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात शाहरूख खान हा ब्लू जॅकेट आणि जीन्समध्ये दिसतो आहे तोच त्यानं तोंडही लपवलं आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या या व्हिडीओखाली नाना तऱ्हेच्या कमेंट्सही आल्या आहेत. यावेळी त्याच्या या चित्रपटातील 'रमैय्या वस्तावैय्या' हे गाणंही आऊट झालं आहे. 


हेही वाचा : 1 मिनिटासाठी 1 कोटी? मिस दिवा, मिस युनिव्हर्स असणाऱ्या उर्वशीचा भलताच थाट


पीटीआयनं दिलेल्या एका रिपोर्टनूसार कळते की, त्यांना एका अधिकृत व्यक्तीनं माहिती दिली आहे की, ''58 वर्षीय अभिनेता मंगळवारी रात्री पोहाचला आहे. कात्रा येथील बेसकॅम्पनजीक तो पोहचला आहे. त्यानं Tarakote चा रस्ता पकडला आहे. शिरीन येथे 11.40 वाजता रात्री तो पोहचला आहे. त्यानं दर्शन घेतले आणि तो लगेचच निघाला.'' 


पठाणच्या आधीही 2022 च्या डिसेंबरमध्ये तो वैष्णोव देवीला पोहचला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी त्यानं हुडी घातली होती. म्हणजे कोणीच त्याला ओळखणार नाही. आज तो चेन्नईला असेल अशी माहिती कळते आहे. यावेळी जवान या चित्रपटाचा Audio लॉन्च होणार आहे.