`ते` का नाही सोडत आहेत शाहरूखची पाठ? 25 वर्षानंतरही पुन्हा तेच घडलं
शाहरूख खानचा सिनेमा म्हणजे चर्चा तर होणारच..काल शाहरूखच्या `डंकी` सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आणखी एक इंट्रेस्टिंग गोष्ट समोर आली आहे.
मुंबईः बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांचे सिनेमे हे बिग बजेट असतात. त्यामुळे इतर सिनेमाचा फटका बसणार नाही अशा तारखेला हे सिनेमे रिलीज केले जातात. मात्र तरीही दोन बिग बजेट सिनेमा एकाच तारखेला रिलीज झाल्यास आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.
साधारण 24 वर्षांप्रर्वी म्हणजे 1998 मध्ये असेच दोन मोठे बिग बजेट सिनेमे एकाच तारखेला रिलीज झाले. त्यात एक होता शाहरूख खानचा 'कुछ कुछ होता है' आणि दुसरा होता गोविंदा आणि अमिताभचा 'बडे मियाँ, छोटे मियाँ'.
आता हीच सिनेमाची जोडी 25 वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये पुन्हा आमनेसामने येणार आहे.
हो, तुम्ही बरोबर ऐकताय...16 ऑक्टोबर 1998 रोजी हे दोन्ही सिनेमे रिलीज झाले. आता हाच योग पुन्हा एकदा जुळून आला आहे.
नुकतंच शाहरूखने त्याच्या आगामी डंकी या सिनेमाची घोषणा केली. डंकी हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.
तर याच दिवशी 'बडे मियाँ, छोटे मियाँ'चा रिमेक रिलीज होणार आहे, ज्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे 'डंकी' आणि 'बडे मियाँ, छोटे मियाँ'मध्ये कोण बडे मियाँ ठरणार आणि कोण छोटे मियाँ ठरणार हे पाहावं लागेल.