...तर शाहरुखला शेजारच्या मुलीने मारलंच असतं
तो मात्र अनोख्या अंदाजा माध्यमांच्या, चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता
सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' या चित्रपटाची बरीच चर्चा सध्या संपूर्ण कालाविश्वात पाहायला मिळत आहे. याच चर्चांच्या वर्तुळात किंग खानच्या या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफही हजर होत्या. एकिकडे सोशल मीडियावर किंग खानच्या या आगामी चित्रपटाच्या चर्चांना सुरुवात झालेली असतानाच दुसरीकडे तो मात्र अनोख्या अंदाजा माध्यमांच्या, चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता आणि ट्रेलर लाँच सोहळ्याची रंगत खऱ्या अर्थाने वाढवत होता.
शाहरुखला विविध प्रश्नांचा सामना या सोहळ्यात करावा लागला. ज्यामध्ये त्याचा सामना अप्रत्यक्षपणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबतही झाला.
गेल्या काही दिवसांपासून बरेच क्रिकेटर, हे शून्य अर्थान 'झिरो'वरच बाद होत आहेत. तर मग, त्यापैकी कोणत्या अशा खेळाडूची तू निवड करशील जो 'झिरो'वर बाद झाला आहे जेणेकरुन तो तुझ्या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये योगदान देऊ शकेल? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
वातावरण विनोदी
या प्रश्नाचं उत्तर त्याने जरा सावधगिरीनेच दिलं. कारण, भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णाधाराची पत्नी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याच्या शेजारीच बसलेली होती. त्यामुळे मी जर या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझ्या शेजारी बसलेली मुलगी मला मारेलच असं म्हणत शाहरुखने संपूर्ण वातावरण विनोदी केल्याचं पाहायला मिळालं.
अनुष्काचा उल्लेख 'मिसेस क्रिकेटर' असा करत त्याने क्रिकेटविषयी कोणतीही चुकीची बाब बोलणं टाळलं.
ट्रेलर लाँच सोहळ्याच्या निमित्ताने किंग खानने यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छाही दिल्या. दीप-वीरने आमंत्रित केलंच तर आम्ही त्यांच्या विवाहसोहळ्याला नक्की जाऊ, असं सूचक विधान शाहरुखने केलं.
तेव्हा आता हा किंग खान दीप-वीरच्या लग्नाला पोहोचणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा मुद्दा इथे महत्त्वाचा असल्यामुळे नक्की पाहा 'झिरो'चा हा ट्रेलर.....