`परदेस`मधील अभिनेत्री महिमा चौधरीचा बदलला संपूर्ण लुक, आता दिसते अशी
शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांचा परदेस हा आजही लोकांना आवडीने बघायला आवडतो.
मुंबई : शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांचा परदेस हा एक असा चित्रपट होता. जो आजही लोकांना आवडीने बघायला आवडतो. हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील महिमा चौधरीची भूमिका, शाहरुख खानची शैली आणि मनाला भिडणारी गाणी यामुळे चित्रपट हिट झाला. आजही लोकं चित्रपटातील महिमा चौधरीच्या शैलीचं आणि सौंदर्याचं कौतुक करतात. त्याचबरोबर चाहत्यांना आजही तिची आठवण येते. चला तर मग पाहूया अभिनेत्री आता कशी दिसतेय.
महिमा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. लाल रंगाच्या पोशाखातील ड्रेसमधील तिचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोवर चाहत्यांनीही जोरदार कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय की, तू पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसू लागली आहेस. तर अजून एका युजरने लिहिलंय की, तू अजिबात बदलली नाहीस जशी होतीस तशीच आहेस.
महिमा चौधरीचं खरं नाव रितू चौधरी आहे. परदेस सिनेमातून धमाकेदार सुरुवात केल्यानंतर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. यानंतर ती शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारच्या 'धडकन' चित्रपटात दिसली. यानंतर ती 'ऐ दिल है तुम्हारा', 'ओम जय जगदीश', 'तेरे नाम', 'बागबान' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.