NCB कार्यालयात शाहरुख खानच्या Driver ची चौकशी सुरु
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शुक्रवारी आर्यनसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. या सुनावणी मध्ये न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. आर्यनला जामीन मिळण्यासाठी मानेशिंदे यांनी मोठे प्रयत्न केले.
आर्यनसह ताब्यात असलेल्या सात जणांना जेजे रुग्णालयात नेलं होतं. त्यानंतर त्याला आर्थर जेलमध्ये नेण्यात आलं. आता आर्यन खानचा जामिन किल्ला कोर्टानं फेटाळला आहे. आर्यनसोबत अजून तीन आरोपींचे देखील जामिन कोर्टाने फेटाळला आहे. यानंतर आता शाहरुख खानच्या ड्राईव्हरला चौकशीसाठी एनसीबीने बोलावलं होतं. आता शाहरुखच्या ड्राईव्हरची चौकशी एनसीबी ऑफिसमध्ये सुरु आहे.
दरम्यान, 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेतलं. गुरुवारी आर्यन खानसह 8 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आर्यन खानची गुरूवारची रात्रही जेलमध्येच गेली. आर्यनसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानं गुरूवारही त्याला जेलमध्येच मुक्काम करावा लागला. शुक्रवारी रात्री आठही आरोपी NCB कोठडीत होते मात्र NCBला आरोपींची चौकशी करायला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे आता आर्यनला कधी जामिन मिळेल हे पहाणं औत्सुक्यातं ठरणार आहे.