मुंबई : बॉलिवूड किंग खान शाहरुख कोरोना संकटाच्या काळात गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. शाहरुखने त्याचं ऑफिसही कोरोना रुग्णांसाठी दिलं आहे. आता पुन्हा एकदा शाहरुखने मदतीचा हात पुढे केला असून त्यांच्या या कृत्यामुळे सर्वांकडूनच त्याची प्रशंसा होत आहे. किंग खानच्या मीर फाऊंडेशन (Meer Foundation)या एनजीओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका चिमुकल्याचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेला फोटो नुकत्याच व्हिडिओ व्हायरल झालेल्या मुलाचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुजफ्फरपुर स्टेशनवर एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह प्लॅटफॉर्मवरच पडून होता. त्या महिलेच्या मृतदेहासोबत एका चिमुकलाही होता. हा चिमुकला आईच्या मृतदेहावर असलेल्या ओढणीशी खेळत होतो. तो आपल्या झोपलेल्या आईला हलवण्याचा, उठवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या चिमुकल्याला आपली आई या जगातच नाही, याची जराही त्याला कल्पनाही नव्हती. 


या चिमुकल्याला मीर फाऊंडेशनने मदत केली आहे. एक फोटो शेअर करत मीर फाऊंडेशनने, त्या सर्वांचे आभार मानले आहेत, ज्यांनी-ज्यांनी या मुलापर्यंत पोहचण्यासाठी मीर फाऊंडेशनला मदत केली.



चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीर फाऊंडेशन त्या मुलापर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. शाहरुखच्या मीर फाऊंडेशन या एनजीओने या मुलाची जबाबदारी घेतली आहे. हा चिमुकला सध्या त्याच्या आजी-आजोबांसह, त्यांच्या देखरेखीखाली आहे.