मुंबई : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब कायम सर्वत्र चर्चेत असतं. शाहरुख फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, अनेकदा खासगी गोष्टींमुळे देखील चर्चेत असतो. असा एकही दिवस नसतो, जेव्हा शाहरुख त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय नसतो. आता फक्त शाहरुख नाही त्याच्या तीन मुलांची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगलेली असते. सध्या शहरुख एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो फोटो पाहून शाहरुखची लेक सुहानाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द सुहानाने वडिलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'वयाच्या 56 व्या वर्षी माझे बाबा... त्यांना पाहून आपण कोणतेही कारणं देवू शकत नाही...' असं लिहिलं आहे. 



फोटोमध्ये शाहरुखचे 8 पॅक एब्स पाहून खुद्द सुहाना देखील थक्क झाली आहे. शाहरुखचा शर्टलेस लूक पाहून फक्त सुहानाचं नाही तर, सर्वचं थक्क झाले आहेत. वयाच्या 56 व्या वर्षी मस्कुलर  बॉडी बनवून शाहरुखने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.


काय आहे फोटोमागील सत्य...
सोशल मीडियावर शाहरुखचा जो फोटो व्हायरल होत आहे, तो अभिनेत्याच्या आगामी 'पठाण' सिनेमातील आहे. सिनेमात शाहरुख शिवाय अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) भूमिकेत दिसणार आहे.