मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा या बाप-लेकींच्या नात्यातील गोडवा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येत असतो. असचं काहीसं घडलं आहे, बॉलिवूडच्या किंग खानसोबत. शाहरूख त्याच्या लेकीसाठी चक्क फोटोग्राफर झाला आहे. बालपणाची मैत्री कधीही विसरता येत नाही. सुहाना खान, आनन्या पांडे आणि शनाया कपूर या तिघींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि हा फोटो खुद्द शाहरूखने कॅमेरामध्ये टिपला आहे. अनन्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'चार्लि़ज एन्जल' असे लिहिले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अनन्या पांडेने  'स्टूडंट ऑफ द ईयर' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर सुहाना आणि शनाया सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. नुकताच सुहानाने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. हाच आनंददायी क्षण साजरा करत माय-लेकींनी महाविद्यालयात जेवणाचा आस्वाद घेतला. गौरीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Ardingly College मध्ये जेवण... आणि पदवी' असे लिहिले होते. 


गतवर्षी सुहानाने तिच्या वडिलांच्या 'झिरो' या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याचप्रमाणे रंगमंचावरील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची असून मुलाला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.