मुंबई : सिनेमाच्या शुटींगमध्ये सतत बिझी असणाऱ्या सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढला आहे. तो सध्या आपला मुलगा अबरामसोबत स्वीत्झरलॅंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत आपल्या मुलाला स्वीत्झरलॅंड दर्शन करवत आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खानदेखील आहे. गौरी या क्षणांना कॅमेरामध्ये कैद करतेय. यातील एक फोटो शेअर करत त्यावर तिने 'स्नोमॅन' अशी कॅप्शन लिहिलेय.


फोटो आणि कॅप्शन  



याचसोबत गौरीने शाहरूखचा बेड, लिफ्ट आणि इतर फोटोही शेअर केले आहेत. 'तुम्ही जेवढ करु शकता त्यापेक्षा तुम्हाला जास्तच मिळत..स्की...माझ्या छोट्या मुलासोबत एका छोट्या सुट्टीवर...' अशी कॅप्शन तिने लिहिली आहे.