मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूरची पत्नी शिवांगी कोल्हापुरे या लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. शिवांगी यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे भाऊ आहेत. एका मुलाखतीत शक्ती कपूर यांनी लताजींशी संबंधित एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, शिवांगीचे कुटुंब त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते, म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्ती कपूर यांनी सांगितले की, "जेव्हा माझे वडील सिकंदर लाल कपूर यांना याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले.


माझ्या आईने शिवांगीला एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर माझ्या पेक्षा 10-12 वर्षांनी लहान असलेल्या शिवांगीला माझे वडील भेटले तेव्हा तिला पाहून ते खूप आनंदी झाले आणि ती खूप गोड मुलगी असल्याचे सांगितले.


मग शिवांगीने एका गाण्याच्या काही ओळी गायल्या आणि माझे वडील उभे राहिले. म्हणाले की, ती इतकी छान कशी गाते? मग शक्ती कपूर यांनी सांगितले की, लताजी शिवांगी यांच्या आत्या आहेत.हे ऐकताच शक्ती कपूर यांचे वडील म्हणाले तुझ्या सगळ्या चुका माफ, कारण तू मोठ्या कुटुंबासोबत नातं जोडलं आहेस.


पण शक्ती कपूर यांच्या वडिलांनी शिवांगीकडून लताजींची काही गाणी ऐकली आणि तिला सांगितले की ते लतादीदींचे मोठे फॅन आहेत. 


पुढे शक्ती कपूर म्हणाले, "जेव्हा शिवांगी यांनी लताजींची गाणी गायली, माझे वडील भावूक झाले."


श्रद्धाबद्दल बोलताना शक्ती कपूर म्हणाले,"मला वाटते की मुलगी श्रद्धा देखील एक चांगली गायिका आहे, कारण ते तिच्या रक्तातच आहे. मला आठवते मी दिल्लीत असताना श्रद्धाने मला फोन केला आणि म्हणाली, बाबा, मी एक गाणे रेकॉर्ड केले आहे.



मी तिला म्हणालो की, तू विनोद करू नकोस पण नंतर तिने मला ते गाणं ऐकवलं. तिने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही पण तरीही तिने 8-9 चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. मी श्रद्धाला गोल्डन चाइल्ड म्हणतो कारण ती माझी मुलगी आहे म्हणून नाही तर ती अभिनय आणि गायनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता चांगली कामगिरी करत आहे.