Shakti Kapoor in Reality Show Because of Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेता शक्ति कपूरनं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. खासगी आयुष्यात वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एकदा त्यांची मद्यपानाची सवय मोडण्यासाठी रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' चा भाग होण्याचे ठरवले. त्यांना त्यांच्या मुलीला अर्थात श्रद्धा कपूरला सिद्ध करायचे होते की ते एक महिना मद्यपानाशिवाय राहू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्ति कपूर यांनी 'बिग बॉस सीजन 5' मध्ये सहभाग घेतला होता. 2011 मध्ये टेलीकास्ट झालेल्या या शोमध्ये त्यांनी या शोमध्ये येण्याचं कारण देखील सांगितलं होतं. खरंतर प्रीमियरमध्ये त्यांनी सांगितं की त्यांना त्याचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं होतं. मात्र, खरंतर शक्ति कपूर या शोमध्ये जास्त दिवस राहू शकले नाही. 28 दिवसातच ते या घरातून बाहेर पडले. शोमधून बाहेर पडणारे ते पाचवे स्पर्धक होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अभिनेत्यानं या शोमधून बाहेर आल्याच्या काही काळानंतर सांगितलं की ते एक महिना मद्यपानापासून दूर झाल्यानं त्यांची लेक श्रद्धा कपूरला गर्व झाला होता. 'रेडिफ' शी बोलताना शक्ति कपूर यांनी सांगितलं की 'त्यांना त्यांच्या मुलांना हे दाखवून देण्यासाठी भाग झाले होते. तर त्यांना काय दाखवून द्यायचं होतं की एक महिन्यासाठी मद्यपान सोडू शकतो.' 


पुढे शक्ति कपूर यांनी सांगितलं की 'मी तिथे जिंकण्यासाठी नाही तर आपल्या मुलांना हे दाखवून देण्यासाठी की मी एक महिना मद्यपानापासून दूर राहू शकतो. मला गर्व आहे की हे सिद्ध करू शकतो. त्यासोबत, त्याला या गोष्टीचा आनंद होता की जेव्हा मी कॅप्टन होतो तेव्हा घरात कोणाचं भांडण होणार नाही. आता माझी लेक श्रद्धा म्हणते की तिला पुढच्या जन्मी देखील माझी मुलगी म्हणून जन्म घ्यायचा आहे.'


हेही वाचा : एक हिट चित्रपट देऊन 'हा' मुलगा रातोरात झाला स्टार; 20 फ्लॉप देऊनही कोटींच्या संपत्तीचा मालक


शक्ति कपूर यांनी पुढे सांगितलं की 'माझ्या पत्नीला देखील माझ्यावर आणि शोमध्ये मी जसा वागलो त्यावर गर्व आहे. तिनं सांगितलं की तिचं माझ्यावर आधीच खूप प्रेम आहे. त्यामुळे मी तिला सांगितलं की मी तिला आणखी एका हनीमूवर घेऊन जाईन.'