मुंबई : 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी गायींची हत्या आणि गोमांस खाणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. आपण कल्कीची प्रतीक्षा करत आहोत का? ती येईल आणि आपली माता गायीला वाचवेल.... असा प्रश्न मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला. त्यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्यात गायीचं किती मोठं स्थान आहे, हे स्पष्ट केलं आहे. शिवाय त्यांनी गायीचं वैज्ञानीक आणि अध्यामिक महत्त्व पटवून दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आईची ज्याप्रमाणे रक्षा करतो, त्याचप्रमाणे गायीची देखील करावी
'जेव्हा आपल्या घरातील एखादी स्त्री संकटात असेल तेव्हा आपण पोलिसांची किंवा मिलिट्रीची प्रतीक्षा करत नाही. जर आई किंवा बहिणीला वाचविण्यासाठी आपण कोणाची वाट पाहात नाही तर गायीची आपल्यसमोर हत्या होत असते. गाय देखील आपली आई आहे, तिला वाचविण्यासाठी आपल्याला का सांगावं लागतं?'
 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उघड्यावर केली जाते गायीची हत्या
'उघड्यावर गायीची हत्या केली जाते, गोमांस विकलं जातं, खाल्लं जातं... गोमांस निर्यात करण्यात येतं... अनेकदा सांगूनदेखील असे प्रकार सुरू आहेत. काही लोक दुसऱ्या भागातून खावून येतात. त्यामुळे त्यांना आता सवय झाली आहे. ते म्हणतात गोमांस चांगलं लागत... पण लाज वाटली पाहिजे...काही लोकांचा व्यवसाय असल्यामुळे ते हत्या करतात आणि लाखो रूपये कमवतात... '


एवढंच नाही तर मुकेश खन्ना यांनी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी देखील सरकारकडे केली आहे. खन्ना म्हणाले, 'आपला राष्ट्रीय पशू सिंह आहे आणि तो स्वतःची रक्षा करू शकतो पण गाय करू शकत नाही. त्यामुळे सरकारने गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावं...' अशी मागणी खन्ना यांनी केली...