मुंबई : वर्षभरात अनेक पुरस्कार सोहळे या कला जगतामध्ये होत असतात. कलाकार आणि तंत्रज्ञांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. अशाच एका पुरस्कार सोहळ्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. जिथे बऱ्याच कलाकारांची उपस्थिती पाहायला मिलाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शक्तिमान' मालिकेतील 'गीता विश्वास', अर्थात अभिनेत्री वैष्णवी महंतही इथं आली होती. पण, अचानच मोठ्या रागाने तिला हा कार्यक्रम सोडून जावं लागलं. 


सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथे आपल्या संतापाचं कारण वैष्णवी सांगताना दिसत आहे. 


कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक वारंवार आपलं नाव चुकीच्या पद्धतीनं घेत होता, अशी तक्रार तिनं केली. 


मुख्य म्हणजे कहर तेव्हा झाला ज्यावेळी तिला व्यासपीठावरही चुकीच्याच नावानं बोलवण्यात आलं, असंही तिनं स्पष्ट केलं. 


आपल्याला मिळालेली ही वागणूक पाहून वैष्णवीनं कार्यक्रमातून काढता पाय  घेतला. यावेळी आयोजकांवरही ती संतापलेली दिसली. 


वैष्णवीच्या या संतापाचं कारण योग्य असल्याचं म्हणत तिथे उपस्थित असणाऱ्या कलाकारांनीही तिला पाठिंबा दिला. 


एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला अशी अपनास्पद वागणूरक मिळणं ही गंभीर बाब आहे, असंच मत त्यांनीही मांडलं. 



वैष्णवीनं आतापर्यंच काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. पण, 'शक्तिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेमुळं तिला विशेष लोकप्रियता मिळाली.