नवी दिल्ली : देशातील पहिला टेलीव्हीजन सुपरहिरो शो 'शक्तिमान (Shaktimaan)' नव्वदच्या दशकात सर्वात लोकप्रिय ठरला होता. लहान मुलं या शोची आतुरतेने वाट बघायचे. या शोच्या माध्यमातून शक्तिमान मुलांना सकारात्मक संदेश देखील द्यायचा. पण लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या नागरिकांचं मनोरंजन व्हावं म्हणून शक्तीमान पुन्हा एकदा सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाउनमुळे घरात असलेल्या लोकांचा कंटाळा दूर करण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत पुन्हा सुरु केलं आहे. त्यानंतर आता शक्तीमान देखील लवकरच सुरु होणार आहे. शक्तीमानचा सिक्वेल येण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व शूटींग बंद आहेत. शूटींग सुरु झाल्यानंतर याच्या सिक्वेलवर काम करण्यात येईल.


'शक्तिमान'मध्ये गंगाधर आणि शक्तिमान अशा दोन मुख्य भूमिका होता. प्रोड्यूसर मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान'चा सीक्वल येणार असल्याची माहिती दिली आहे. मुकेश खन्ना यांनी म्हटलं की, आम्ही शक्तिमानच्या सीक्वलवर काम करत आहोत. कारण लोकांना जाणून घ्यायचं आहे की, नंतर काय झालं. शक्तिमानची मागणी पुन्हा वाढली आहे.


मुकेश खन्ना यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'रामायण आणि महाभारत बघायला मिळत आहे. या दोन शो सोबतच शक्तिमान लवकरच सुरु होणार आहे.' महाभारतात देखील मुकेश खन्ना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी भीष्म पितामह यांचा रोल केला होता. त्यांची भूमिका पाहून अनेक जण त्यांचे फॅन झाले होते.