मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेतील प्रमुख पात्र असलेला ओम म्हणजे अभिनेता शाल्व किंजवडेकर आपल्या अभिनयामुळे आणि खासगी आयुष्यामुळे खप चर्चेत असतो. शाल्व कायमच आपल्या सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. आज शाल्वने आपल्या गर्लफ्रेंडला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाची बाब म्हणजे श्रेया डाफळापूरकरचा मंगळवारी 9 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. शाल्वने तिला सगळ्यात उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर अनेक कलाकारांनी देखील कमेंट करत श्रेयाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


शाल्वची पोस्ट व्हायरल 



असे वाटते की आपण एकमेकांना ओळखून अनेक वर्षे झाली आहेत.. तू एक सुंदर व्यक्ती आहेस आणि मी तुला स्वतःसाठी कठोर परिश्रम करताना पाहिले आहे. मी तुझ्यासाठी नेहमीच असेन, आपण एकत्र उत्तम टीम आहोत, असं म्हणत शाल्वने खास पोस्ट केली आहे. 



श्रेया डाफळापूरकर असे शाल्वच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशनशिपला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रेमसंबंध आणि खासगी आयुष्याबद्दल शाल्व जाहीरपणे बोलत नाही. पण श्रेया सोबतचे सोशल मीडियावरील शाल्वचे रोमँटिक फोटो त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल सर्व काही सांगून जातात. लहानपणापासूनची मैत्री आणि त्यातून निर्माण झालेलं समजुतदारपणाचं नातं, जवळीक आणि सुसंगती असं काहीस घट्ट नात दोघांमध्ये असल्याचं त्याने सांगितलं आहे. श्रेया ही स्टायलिस्ट असून तिचं स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे. शाल्व किंजवडेकरने हंटर, मेड इन हेवन आणि वन्स अ इअर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.