नवी दिल्ली : टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सध्या दुबईत आपल्या सुट्या एन्जॉय करत आहे. या दरम्यान शमा सिकंदरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोजही पोस्ट केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमा सिकंदरने आपल्या सुट्टीतील फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर ते व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये शमा खूपच सुंदर दिसत आहे. शमा सिकंदर नेहमीच आपल्या व्हॅकेशनचे अपडेट्स आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरुन देत असते.


Image: Shama Sikander Instagram

शमाने ऊंटासोबतचा आपला एक फोटो ही पोस्ट केला आहे. दुबईसाठी रवाना झालेल्या शमा पूर्वीपासूनच प्रसिद्ध ठिकाणांवर भ्रमंती करत असल्याचं पहायला मिळालं आहे.


Image: Shama Sikander Instagram

यापूर्वी शमा आपल्या सुट्टी दरम्यान स्वित्झर्लँडला गेली होती. या दरम्यान शमाने प्राग, बुडापिस्ट सारख्या ठिकाणांचा दौरा केला होता.


Image: Shama Sikander Instagram

शमा सिकंदरला टीव्ही शो 'ये मेरी लाईफ है'च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली होती. या शोमध्ये ती खूपच सिंपल भूमिकेत दाखवण्यात आली होती. शमाने या शोमध्ये पूजा मेहताची भूमिका करत घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.


Image: Shama Sikander Instagram

सोबतच शमाने 'धूम धडाका', 'अंश: द डेडली पार्ट', 'मन', 'प्रेम रतन' आणि 'कॉन्ट्रॅक्ट' सारख्या सिनेमांत काम केलं आहे. छोट्या पडद्यावर 'बालवीर', 'सेवन', 'पॉपकॉर्न न्यूज', 'सीआयडी' आणि 'काजल' सारख्या शोजमध्ये शमाने भूमिका केली आहे.


Image: Shama Sikander Instagram

नंतर शमा सिकंदरने शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्येही काम केलं.