मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिचा बोल्ड व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय?
शमा सिकंदरने (Shama Sikander) तिच्या इन्स्टाग्राम अंकाऊंटवर नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, शमा सिकंदर एका पुलवर उभं राहून बोल्ड डांस करताना दिसत आहे. 'टीप टीप बरसा' या रोमँटीक गाण्यावर ती डान्स करत आहे. या गाण्यावर तिने भन्नाट डान्स केला आहे. हा डान्स करता करता ती त्या पुलमध्ये उतरते. या पुलमधला हा तिचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.


लुकची चर्चा 
व्हिडिओत शमा सिकंदरच्या (Shama Sikander) लुकने प्रेक्षकांना वेड लावले आहे. शमा सिकंदर पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. आणि पिवळ्या कलरचा ब्लाऊज घातला आहे. हा तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. चाहत्यांना तिचा हा लुक फार आवडला आहे. 



दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट करत तिने त्याला भन्नाट कॅप्शन दिली आहे. परफेक्ट गाण्यासाठी परफेक्ट मौसम, अशा आशयाच कॅप्शन तिने दिले आहे. 


शमा सिकंदरला (Shama Sikander Photo) टीव्ही शो 'ये मेरी लाइफ है' मधून विशेष ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्री चित्रपट आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. तिने पडद्यावर जबरदस्त सिझलिंग सीन्स दिले आहेत. या शिवाय, ती जेव्हाही तिचे फोटो किंवा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते, त्यावेळी तिच्या या फोटोंची चर्चा होत असते.