मुंबई : डान्स चे गुरु म्हणून ओळखले जाणारे शामक दावर नेहमीच आपल्या नृत्यशैलीतून लोकांचं मनोरंजन करत असतात , त्याचप्रमाणे आपली नृत्यकला सामान्य जनतेलाही शिकवत असतात . वेगवेगळ्या कलांसाठी ओळखले जाणारे अष्टपैलू शामक दावर यांनी विंटर फंक नावाने  डान्स सेशन खुलं करीत आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंटर फंक २०१७ वर्कशॉप हे संपूर्ण भारतभर होत असून मुंबई मध्ये १० ऑक्टोबर पासून सुरु होत आहे . ज्यांना नृत्याची आवड आहे आणि ज्यांना शामक दावर  यांच्याकडून कला शिकायची असेल त्यांच्यासाठी हि उत्तम संधी आहे .


विंटरफंक ची खासियत अशी की डान्सव्यतिरिक्त आपणाला अनेक गोष्टी शिकवण्याचा शामक यांचा मानस आहे , जसे की सतेज परफॉमन्स तांत्रिक बाबी, आत्मविश्वास वाढवणे तसेच परफॉमन्स साठी वेशभूषा आणि अन्य गोष्टीची तयारी कश्या प्रकारे करावी याचे सम्यक ज्ञान ह्या वर्कशॉप मध्ये घेता येणार आहे . 


विंटरफंकमध्ये सहभागी झाल्यास शामक दावरच्या आगामी ग्रॅंड शोमध्ये याच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. तेव्हा येत्या ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्ही शामक स्टाईलमध्ये परफॉर्म करू शकता.