शमिता आणि राकेश लवकरच अडकणार विवाहबंधनात?
बिग बॉस ओटीटी संपला आहे. पण तरीही या शोबद्दलच्या चर्चा अजूनही चालू आहेत.
मुंबई : बिग बॉस ओटीटी संपला आहे. पण तरीही या शोबद्दलच्या चर्चा अजूनही चालू आहेत. ओटीटीवरील हा पहिला सीजन होता जो खूप चर्चेत होता. कधी कुणाच्या रागामुळे तर कधी कुणाच्या प्रेमामुळे. शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा रोमँटिक अंदाज संपूर्ण जर्नीमध्ये चर्चेत होता. आणि आता घराबाहेर पडल्यावरही दोघे एकत्र दिसले आहेत.
नुकतेच दोघेही वरळीतील एका पॉश रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी पोहोचले. यावेळी फक्त हे दोघे त्यांच्यासोबत होते आणि इतर कोणीही त्यांच्यासोबत नव्हते.या दरम्यान, दोघांनीही त्यांच्या हातात हात घालून एकत्र पोज दिले आणि फोटो क्लिक केले.
शमिताने यावेळी पीच कलरचा टॉप आणि बॉडीकॉन स्कर्ट परिधान केला होता. ज्यात ती प्रत्येक वेळेप्रमाणे खूप सुंदर दिसत होती. दोघेही शोनंतर एकत्र दिसल्याने लवकरच हे कपल लग्न बंधनात अडकणार आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.
बिग बॉसच्या घरात शमिताने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. राकेश मात्र संभ्रमात दिसला. आता दोघेही डेट करत असल्याने लवकरच सनईचौघडे वाजणार का असा एकत्र प्रश्न या कपलला विचारला जात आहे.