शमिता शेट्टीने बिग बॉसच्या घरात दिली प्रेमाची कबुली; राकेशला किस करत म्हणाली...
बिग बॉस ओटीटी शो राकेश-शमितामुळे चर्चेत आहे.
मुंबई : बिग बॉस ओटीटी शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. स्पर्धक शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील वाढती जवळीक. आता शोमध्ये चार जोड्या आणि दिव्या अग्रलाव आहेत. पण बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे शमिता-राकेश. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील फार आवडत आहे. दोघेही एकमेकांसाठी खूप भावनिक होताना दिसतात. एवढंच नाही तर शमिताने आता प्रेमाची कबुली देखील दिली आहे.
आता सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटी शोचा एक प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राकेश-शमिता रोमांटिक होताना दिसतात. व्हिडिओमध्ये राकेशला किस करत शमिता 'आय लव्ह हिम' असं म्हणत आहे. तर दुसरीकडे राजेश तिला फुट मसाज करून देत आहे तर कधी तिची काळजी घेताना दिसत आहे.
दोघे डान्स करताना देखील दिसत आहेत. त्यांचा हा रोमांटिक डान्स चाहत्यांना देखील फार आवडला आहे. बिग बॉसच्या घरातून सतत राकेश-शमिताचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर देखील त्यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते.