ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान शमिताचा अवतारचं बदलला... व्हिडिओमुळे चर्चा
ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.
मुंबई : शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची प्रेमकहाणी बिग बॉस ओटीटीपासून सुरू झाली. तेव्हापासून दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. बिग बॉसनंतरही शमिता आणि राकेश सगळीकडे एकत्र दिसत आहेत.
शमिताच्या घरच्यांनाही राकेश खूप आवडतो. राकेश अनेकदा शमिताच्या फॅमिली फंक्शन्समध्ये दिसतो.
काही दिवसांपासून राकेश आणि शमिताच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. त्यावर शमिताने मौन सोडले आहे. आता ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान राकेश आणि शमिता एकत्र दिसले आहेत.
दोघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत.
तर आता शमिताचा अवतार काहीसा बदलेला दिसत आहे. शमिता आणखीनंच बोल्ड लूकमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसली. ज्यामुळे उपस्थित सगळ्यांच्या नजरा शमिताकडेच दिसून आल्या.
शमिताने ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये अगदी बोल्ड लूक केला होता. शमिता आणि राकेश एका अवॉर्ड फंक्शनला एकत्र गेले होते. शमिता आणि राकेशचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.