जग विरोधात असताना बहिणीसाठी उभी राहिली शमिता
`इतर लोक तुम्हाला कसे पाहतात, यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही`.
मुंबई : राज कुंद्रा गेल्या अनेक दिवसांपासून पॉर्नोग्राफीच्या आरोपात अडकला आहे. दिवसेंदिवस या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या समस्या सतत वाढत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत राजच्या कुटुंबासह त्याच्याशी संबंधित लोकही कचाट्यात आले आहेत.
दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी यांना सतत ट्रोल केले जात आहे. अलीकडेच, शमिता सलूनमध्ये जाताना दिसली, त्यानंतर काहींनी तिला टोंमणे मारायला सुरुवात केली. लोकांनी सांगितले की मेहुणा तुरुंगात आहे आणि तू मजा करत आहे. या सर्व गोष्टींमध्ये, आता चर्चा आहे की बहीण शिल्पा आणि मेहुणा राज कुंद्रा शमिताचा सर्व खर्च उचलत होते. आता स्वतः शमिताने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची बहीण शमिता शेट्टी सातत्याने शिल्पाला पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत, लोकांनी असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे की शमिताचा सर्व खर्च तिची बहीण आणि मेहुणा उचलतात, म्हणून ती हे करत आहे. या सर्व चर्चांना शमिताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
एका मुलाखतीदरम्यान शमिताने मौन सोडले आणि म्हणाली, 'मला स्पष्टपणे सांगायचे आहे की मी माझी काळजी घेण्यास सक्षम आहे, मी कोणावर अवलंबून नाही.''
शिल्पाला शमिताचा पाठिंबा
शमिताने तिच्या बहिनीला पूर्ण पाठिंबा दिला आहे, आणि तिला सांतवन दिले आहे की, 'इतर लोक तुम्हाला कसे पाहतात, यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही'. लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ज्या समस्यांमधून जात आहेत, ते इतरांचे जीवन त्यांच्या स्वतःच्या नजरेतून पाहतात जे आपल्या हातात नाही. फक्त आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करत रहा आणि शक्य तितके प्रेम करा.
त्याचबरोबर त्यांनी शिल्पाच्या हंगामा 2 या चित्रपटासाठीही शुभेच्छा दिल्या. शमिता यांनी लिहिले, 'ऑल द बेस्ट माय डार्लिंग मंकी तुमच्या हंगामा चित्रपटासाठी, जो 14 वर्षांनंतर रिलीज झाला. मला माहित आहे की तुम्ही यासाठी खूप मेहनत केली आहे, संपूर्ण टीमने हे केले आहे.