Shammi Kapoor : एकेकाळी  बॉलिवूड अभिनेता शम्मी कपूर (Shammi Kapoor) सुपरस्टार होता. त्याने त्याच्या अभिनयाने तो काळ गाजवला होता. त्याच्या अनेक हिट सिनेमांमुळे आजही लोक त्याच्या अभिनयाचे वेडे आहेत. शम्मी कपूरने 1953 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनतर अवघ्या दोन वर्षात गीता बालीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Shammi Kapoor proposed to  18 year old actress  nz)



सिनेजगतात पाऊल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमशेर राज कपूर उर्फ ​​शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी मुंबईत झाला, तो पृथ्वीराज कपूर आणि रामशरणी कपूर यांचा मुलगा होता. शम्मी हा पृथ्वीराजांच्या तीन मुलांपैकी दुसरा होता. त्यांचे दोन भाऊ राज कपूर आणि शशी कपूर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. शम्मी कपूर यांनी 1948 मध्ये त्यांच्या वडिलांच्या पृथ्वीराज थिएटर्समध्ये 50 रुपये पगारासह ज्युनियर आर्टिस्ट म्हणून रुजू होऊन सिनेजगतात प्रथम पाऊल टाकले. या अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील पुढील चार वर्षे पृथ्वी थिएटर्समध्ये काम केले. त्यानंतर 1953 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.


हे ही वाचा - जान्हवी कपूरने धाकट्या बहीनीला दिला 'असा' सल्ला की तुम्ही ऐकून व्हाल हैराण...


 


बॉलिवूडमध्ये पदार्पण 


शम्मी कपूरने 1953 मध्ये 'जीवन ज्योती' या पहिल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. महेश कौल दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्यासोबत लीला मिश्राही मुख्य भूमिकेत दिसली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ब्रह्मचारी, विधाता आणि प्यार किया तो डरना क्या सारखे खूप चांगले चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत, ज्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अभिनेता शम्मी कपूर, 1950 आणि 1970 च्या दशकातील स्टार, याहू आणि एल्विस सारख्या चित्रपटांमधील त्याच्या ऑन-स्क्रीन भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट लक्षात ठेवले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत तो लव्हर बॉयची व्यक्तिरेखा एका नव्या स्टाईलने साकारत असे आणि तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही तितकाच फिल्मी राहिला. चित्रपटात करिअर सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी शम्मीने 'रंगीन रातें' चित्रपटाच्या सेटवर गीता बाली यांची भेट घेतली, त्यानंतर दोघांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केले.


 



 


मुमताजची मुलाखत 


2011 मध्ये तिच्या एका मुलाखतीत मुमताजने सांगितले की, शम्मी कपूरने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते कारण ते ब्रह्मचारीच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते. ही गोष्ट त्यांची पहिली पत्नी गीता बाली हिच्या मृत्यूनंतरची पण त्यांनी लग्नाला नकार दिला कारण शम्मी कपूर यांना मुमताजने लग्नानंतर करिअर सोडून द्यावे असे वाटत होते. हे सांगताना मुमताज म्हणाली, 'मी फक्त 18 वर्षांची होते, जेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारले तेव्हा मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या आणि मला आयुष्यात इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते.' असेही तिने सांगितले. लग्नाला नकार देऊनही संबंध बिघडले नाहीत. याशिवाय मुलाखतीत मुमताजने शम्मीचे कौतुक करत त्याला हँडसम म्हटले होते. ती म्हणाली की 'शम्मी खूप देखणा होता यात काही शंका नाही' आणि 'आजचे हिरो इतके चांगले दिसत नाहीत' असेही ती म्हणाली होता.


हे ही वाचा - दिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या



जगाचा निरोप 


7 ऑगस्ट 2011 रोजी, शम्मी कपूर यांना मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी लाखो प्रयत्न करूनही, 14 ऑगस्ट 2011 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शम्मी कपूरने 2011 साली जगाचा निरोप घेतला.