मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण शनाया कपूरची एन्ट्री अद्याप बॉलिवूडमध्ये झालेली नाही. पण तिच्या चाहत्यांची संख्या मात्र एखाद्या प्रसिद्ध अभीनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. शनायाने काही दिवसांपूर्वीचं तिचं अकाउंट पब्लिक केलं. तेव्हापासून तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता देखील तिने सोशल मीडियावर स्वतःचे बाथरूममधील फोटो पोस्ट केले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचे हे बाथरूममधील फोटो देखील सध्या चर्चेत आहे. शनायाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'अंघोळ झाल्यानंतर तीन तास बाथरूममध्ये बसली होती..' असं लिहीलं आहे. सांगायचं झालं तर शनाया लवकरचं बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. दिग्दर्शक करण जोहर शनाया ब्रेक देणार आहे. 



जान्हवी कपूर नंतर तिची चूलत बहिण शनायाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. शनाया ही अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या आहे. शनाया Dharma Cornerstone Agencyसोबत काम करणार आहे. करण जोहरने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय करणने शनायाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले.