मुंबई : अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार  असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी शनाया एका मोठ्या चित्रपटात दिसू शकते. करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली, शनाया कपूरला लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडच्या एन्ट्री होणार असल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर शनाया कपूर सर्च केलं जात आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनायाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो आहेत ज्यातून असं दिसून येतय की, शनाया स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत नवीन प्रयोग करत असते. शनायाने तिच्या बिकीनी लूकचे अनेक फोटोही इंस्टग्रामवर शेअर केले आहेत. एका शेअर केलेल्या फोटोत शनयाने श्रग आणि नेकपीस परिधान करत बिकिनी लूकला एक वेगळाच टच देण्याचा शनायान प्रयत्न केला आहे


आजकाल प्रिंट बिकिनी ट्रेंडिंगमध्ये आहे. या ट्रेंडला फॉलो करत. प्रिंट बिकिनी ट्रेंडिंग सोबतच प्रिटेंड श्रग देखील शनायाने कॅरी केला आहे. ही बिकिनी बॅरोक्को मोसायिक प्रिंट  वेर्सास ब्रँन्डची आहे। या बिकिनीची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल, टॉपची कींमत 45,500 रुपये आहे तर बॉटमची किंमत 36, 300 रुपये आहे. म्हणजेच या बिकनी सेटची किंमत जवळपास 90 हजार रुपये इतकी आहे


अशामध्ये आपण किंमतीनुसार याकडे पाहिले असता. ही एवढी साधी बिकिनी थोडी जास्तच महाग दिसत आहे. मात्र, शनायाने एक्सेसरीज आणि केलेला सिंपल मेकअपमुळे नक्कीच हा लुक स्टनिंग दिसत आहे.