अखेर शनायाने बांधली लग्नगाठ, inside फोटो व्हायरल
रसिका सुनील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या.
मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे काही असे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले, ज्या चेहऱ्यांमधीलच एक नाव म्हणजे रसिका सुनील हिचं. 'ए गॅरी.....', असं म्हणत 'गुरूनाथ सुभेदार'च्या मागेपुढे घिरट्या घालणारी 'शनाया' साकारत रसिकाने जणू स्वत:चं अभिनय कौशल्य अतिशय सुरेख आणि तितक्याच प्रभावीपणे सर्वांपुढे ठेवलं. आता शनायाच्या चाहत्यासाठी एक गुडन्यूज आहे.
आता शनायाने आपला रिअल लाईफ जोडीदार निवडला आहे. आणि ही जोडी लग्न बंधनात अडकली आहे. शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. आज अखेर तिने तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बानली. एक गोड फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत ही गुड न्यूज रसिकाने दिली आहे.
गोव्याच्या किनाऱ्यावर डेस्टिनेशन वेडिंग करत, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. 18 ऑक्टोबर रोजी ही अभिनेत्री लग्न बंधनात अडकली आहे.आदित्य बिलागी एक डान्सर आहे. आदित्यने रसिकाला अगदी बॉलिवूड फिल्मी स्टाईलने प्रपोज देखील केलं होतं. आता ही जोडी विवाहबंधनात अडकल्याने तिचे चाहते देखील खूश आहेत. सोबतच या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.