मुंबई : अभिनेता इमरान हश्मी स्टारर 'जन्नत' चित्रपटातील अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अभिनयापासून दूर असलेली सोनल सोशल मीडियावर मात्र कायम ऍक्टिव्ह असते. आज सोनमला जुहू् भागात स्पॉट करण्यात आलं. सोनल तेव्हा शनी मंदिरात पोहोचली होती. सोनलचे मंदिरातले फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सोनलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियालर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये सोनलने कुर्ती घातली. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. शिवाय तिने मंदिराबाहेर बसलेल्या काही व्यक्तींना सामान देखील दिलं. शिवाय त्या लोकांसोबत तिने गप्पा देखील केल्या. त्याचप्रमाणे त्यांना कोरोनापासून सतर्क राहाण्याचा सल्ला देखील दिला. यावेळी तिने लहान मुलांसोबत देखील वेळ व्यतीत केला. 


दरम्यान सोनलचं करिअर  संकटात असल्यामुळे शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी ती त्यांच्या दर्शनासाठी मंदिरात आली. सोनल सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहे. तिचे मंदिरातले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर तिला 36 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.