मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्यानं बॉलिवूड गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. आता तर म्हणे त्यांची लग्नाची घटिकाही जवळच आली आहे. पण, त्यातच आलियाचा एक अतिशय रोमँटिक व्हिडीओ समोर आल्यामुळे पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजर रोखून आलिया कोणाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालीये, हाच प्रश्न चाहते करत आहेत. कारण, तिच्यासोबत दिसणारा तो रणबीर नाही. 


साडीमधील आलियाचं रुप न्याहाळताना त्याच्याही मनाची उडणारी तारांबळ व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे. 


आलिया आणि रणबीरमध्ये काही बिनसलंय का, ती या मुलासोबत का दिसतेय, ती हे काय करतेय... असं जर तुम्हीही म्हणत असाल, तर थोडं थांबा.... 


कारण ही चर्चा रंगलीये ती म्हणजे आलियाच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने. 


अभिनेता आणि डान्सिंग स्टार शंतनू महेश्वरी याच्यासोबत ती ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 


याच चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जिथं आलिया आणि शंतनूची मन रोखणारी केमिस्ट्री पाहता येत आहे. 


संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून शंतनूला मिळालेल्या संधीचं तो आता सोनं करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



छोट्या पडद्यावर तर त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली, आता मोठा पडदा गाजवण्यात तो यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Aalia Bhatt, Gangubai Kathiawadi, Shantanu Maheshwari)