मुंबई : बॉलिवूडचं चमकतं जग कोणाला आवडत नाही? मायानगरीमध्ये दररोज अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात, पण सक्सेस तेच होतात ज्यांच्याकडेच टॅलेंट आणि जिंकण्याची इच्छाशक्ती असते. लक्ष्मी बॉम्ब आणि तान्हाजी सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा अभिनेता शरद केळकर याची सक्सेस स्टोरी देखील काहीशी अशीच आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनातल्या गोष्टी उघडपणे सांगितल्या
त्याला याचं वाईट वाटतं की, प्रत्येक कलाकार कधी चांगलं काम करतो तर कधी वाईट काम करतो. पण त्याच्या मागचा संघर्ष कोणाला दिसत नाही. शरद केळकर यांनी मनीष पॉल यांच्याशी झालेल्या संभाषणात या गोष्टी उघड केल्या आणि सर्वांसमोर मन मोकळेपणाने मांडल्या. त्यांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यामागची कथा कोणालाच माहीत नाही
व्हिडिओमध्ये शरद केळकर म्हणाला, 'शहरात लोक काम पाहून काम देतात, जे चांगलं किंवा वाईट असू शकतं. पण त्याच्या पाठीमागचा संघर्ष कोणाला दिसत नाही. मनीषसोबतच्या संभाषणात शरद केळकर म्हणाला, 'तुम्ही दिल्लीहून आला आहात. मी ग्वाल्हेरहून आलो आहे. आता लोकांना वाटतं की मनीषकडे मर्सिडीज आहे. चांगले कपडे घालून केस वैगरेमध्ये टिप-टॉप येतो. 

अशी होती अवस्था शरदची 
शरद केळकर पुढे म्हणाला, 'त्याला माहीतही नाही की, त्यामागची कथा काय आहे? माझ्या आयुष्यात असं घडलं आहे की, माझं क्रेडिट कार्ड सुद्धा संपलं. माझ्या आयुष्यात खरोखर अशी वेळ आली आहे. माझा बँक बॅलन्स शून्य झाला होता. पैसे नव्हते आणि इतकं कर्ज होतं की, एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे क्रेडिट कार्डमधले पैसेही संपले होते''. मुंबई : बॉलिवूडचं चमकतं जग कोणाला आवडत नाही? मायानगरीमध्ये दररोज अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात, पण सक्सेस तेच होतात ज्यांच्याकडेच टॅलेंट आणि जिंकण्याची इच्छाशक्ती असते. लक्ष्मी बॉम्ब आणि तान्हाजी सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा अभिनेता शरद केळकर याची सक्सेस स्टोरी देखील काहीशी अशीच आहे.

मनातल्या गोष्टी उघडपणे सांगितल्या
त्याला याचं वाईट वाटतं की, प्रत्येक कलाकार कधी चांगलं काम करतो तर कधी वाईट काम करतो. पण त्याच्या मागचा संघर्ष कोणाला दिसत नाही. शरद केळकर यांनी मनीष पॉल यांच्याशी झालेल्या संभाषणात या गोष्टी उघड केल्या आणि सर्वांसमोर मन मोकळेपणाने मांडल्या. त्यांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यामागची कथा कोणालाच माहीत नाही
व्हिडिओमध्ये शरद केळकर म्हणाला, 'शहरात लोक काम पाहून काम देतात, जे चांगलं किंवा वाईट असू शकतं. पण त्याच्या पाठीमागचा संघर्ष कोणाला दिसत नाही. मनीषसोबतच्या संभाषणात शरद केळकर म्हणाला, 'तुम्ही दिल्लीहून आला आहात. मी ग्वाल्हेरहून आलो आहे. आता लोकांना वाटतं की मनीषकडे मर्सिडीज आहे. चांगले कपडे घालून केस वैगरेमध्ये टिप-टॉप येतो. 

अशी होती अवस्था शरदची 
शरद केळकर पुढे म्हणाला, 'त्याला माहीतही नाही की, त्यामागची कथा काय आहे? माझ्या आयुष्यात असं घडलं आहे की, माझं क्रेडिट कार्ड सुद्धा संपलं. माझ्या आयुष्यात खरोखर अशी वेळ आली आहे. माझा बँक बॅलन्स शून्य झाला होता. पैसे नव्हते आणि इतकं कर्ज होतं की, एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे क्रेडिट कार्डमधले पैसेही संपले होते''.