Sharad Kelkar : जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून... "काही ‘रानटी’ असतात,  काही बनतात!" आता या चित्रपटात हिंदी-मराठी चित्रपटातील अभिनेता शरद केळकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने  भरलेला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शरद केळकर हा पडद्यावर किती रानटी दिसणार याचा एक अंदाज येतोय.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

भूमिकेबद्दल बोलताना शरद म्हणाला की,'अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्तानं हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्तानं श्वास रोखून ठेवणारा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


दिग्दर्शक समित कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन, एंटरटेनमेंट ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपानं मिळणार असल्याचं समित सांगतात. समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ सॉइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्‍या या चित्रपटाची निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे. 


या चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम या चित्रपटाला लाभलेली आहे.


हेही वाचा : अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्याच्या 'त्या' कृतीमुळे पुन्हा मिळाली हवा! चाहत्यांसमोर प्रश्न उपस्थित


आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, 'रानटी’ चित्रपटाच्या निमित्तानं एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कडनं नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.' 22 नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.