Vikram Gokhale Death: `आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला`
Vikram Gokhale Death: विक्रम गोखले यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त समोर येताच अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत दिलेली प्रतिक्रिया पाहाच
Vikram Gokhale Passes Away: अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर ( Deenanath Mangeshkar Hospital Pune ) रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी याडगीकर यांनी दिली. पण आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेते शरद पोंक्षे ( sharad ponkshe) यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 'विक्रम गोखले आमच्या सर्वांचे गुरू आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही अभिनय शिकलो, अनेक कलावंत तयार झाले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या निधनाच्या चर्चांनी सर्वत्र खेळखंडोबा केला होता. अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आता त्यांचा जीव शांत झाला...' असं म्हणत शरद पोंक्षे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.'
ते पुढे म्हणाले, 'आमचे गुरु गेले, आमचा काका गेला, पाठीराखा गेला.... आमच्या पिढीला पोरकं करून गेले विक्रम दादा... याचापेक्षा याक्षणी मी आणखी बोलू शकत नाही. त्यांच्या आत्म्याला शांती मिळूदे... काल संध्याकाळी अशी आशा निर्माण झाली होती, ते परत उभे राहतील, काम करतील, आमच्यासोबत परत बोलतील, रागावतील...' असं म्हणत शरद पोंक्षे यांनी भावना व्यक्त केल्या.
विक्रम गोखले यांची गाजलेली नाटकं
एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना आणि नकळत सारे घडले ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत.
विक्रम गोखले यांचे गाजलेले सिनेमे
'मॅरेथॉन जिंदगी' , 'आघात' हा त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट, 'आधारस्तंभ', 'आम्ही बोलतो मराठी', 'कळत नकळत', 'ज्योतिबाचा नवस', 'दरोडेखोर', 'दुसरी गोष्ट' , 'दे दणादण', 'नटसम्राट', 'भिंगरी' , 'महानंदा' ,' माहेरची साडी' आणि 'वासुदेव बळवंत फडके' त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.
विक्रम गोखले यांना मिळालेले पुरस्कार
'अनुमती' या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.