मुंबई : अभिनेता शरमन जोशी नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतो. सोलो हिरो म्हणून त्याने कधीच मोठे चित्रपट केले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याच्या कायमच महत्त्वपूर्ण भूमिका असतात. सर्वांची मने जिंकणार्‍या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत शरमन जोशी आघाडीत आहे. शर्मनने चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या असल्या तरी शर्मनला विनोदी चित्रपटात प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली होती. चला तर मग एक नजर टाकूया  त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरमन जोशीने आपल्या करिअरची सुरुवात गुजराती रंगभूमीपासून केली. शर्मनचे वडील अरविंद जोशी सुप्रसिद्ध गुजराती थिएटर आणि चित्रपट कलाकार होते. शर्मनचा पहिला चित्रपट 'गॉडमदर' होता. एका मुलाखतीत शर्मनने सांगितलं होतं की, सुरुवातीला त्याची कॉमेडी टाईमिंग खूप वाईट होती. तो म्हणाला होता की, 'लोकांनी माझ्यावर खूप टीका केली पण आमचे दिग्दर्शक शफी इनामदार यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं.


जवळजवळ ५० कार्यक्रम झाल्यानंतर माझी अॅक्टिंग सुधारु लागली. शर्मनने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं असले तरी त्यांच्या हिट लिस्टमध्ये 'गोलमाल', 'स्टाईल', '3 इडियट्स', 'रंग दे बसंती' आणि 'एक्सक्यूज मी' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.


'रंग दे बसंती' आणि '3 इडियट्स' सारख्या चित्रपटात काम केलेल्या शर्मनला 'फरारी की सवारी' या चित्रपटासाठी 40 वेळा ऑडिशन द्यावी लागली हे फार कमी लोकांना माहिती आहे. विधु विनोद चोप्रा या सिनेमाचे निर्माते होते, यात मुख्य भूमिका साकारण्यासाठी शर्मनला अनेक पापड पेलावे लागले.


1999 साली आलेल्या 'गॉडमदर' सिनेमातून अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकल्यानंतर १३ वर्षानंतर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'फेरारी की सवारी' चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. एका मुलाखतीमध्ये त्याला या संदर्भात प्रश्न विचारणअयात आला होता, त्याला विचारलं की, त्याला इतका वेळ मुख्य भूमिकेत दिसायला का लागला? या प्रश्नाचं उत्तर देताना शरमनने सांगितलं की, 'भाऊ, पाहा मी एक शर्यतीतला घोडा आहे. मला काही घाई नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की, मी जो चित्रपट केला आहे तो एक चांगला चित्रपट आहे. आणि मी चांगलेच सिनेमा या पुढेही करणार आहे.


पुढे शरमन म्हणाला, "जर मी माझ्या आयुष्यात किमान दहा चांगले चित्रपट केले असतील तर मला माझ्यावर अभिमान वाटला पाहिजे." मला किमान दहा चांगले चित्रपट करायचे आहेत. माझा असा विश्वास आहे की मी लवकरच काही उत्तम सिनेमा आणि मनोरंजक चित्रपट करण्याचा प्रयत्न करेन.