3 Idiots Sharman Joshi : बॉलिवूड अभिनेता आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांचा '3 इडियट्स' हा चित्रपट पाहण्यासाठी आजही लोक उत्सुक असतात. त्यांचा हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाला इतकी वर्षे उलटली असली तरी देखील हा चित्रपट कधीही ट्विव्हीवर लागला तरी लोक आवडीनं पाहतात. या चित्रपटातील कॉमेडी डायलॉग्स आणि रॅन्चो म्हणजेच आमिरचा भोळे पणा हा तर सगळ्यांची मने जिंकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार अशा चर्चा सुरु होत्या. पण ते सगळे फक्त एका जाहिरातीसाठी एकत्र आले होते. दरम्यान, शरमन जोशीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दुसऱ्या भागाविषयी वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरमन नुकताच Kafas या वेब सीरिजमध्ये दिसला. या वेब सीरिज दरम्यान, दिलेल्या मुलाखतीत शरमननं खुलासा केला की राजकुमार हिरानी यांना '3 इडियट्स' चा सिक्वेल बनवायचा आहे आणि त्यांच्याकडे अनेक आयड्या आहेत. पण सध्या या सगळ्या आयड्यांवर काम करणं गरजेचं आहे. तर शरमननं आमिर आणि आर माधवनसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी आनंदीत आणि उत्सुक असल्याचं सांगितलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 'डीएनए' ला दिलेल्या मुलाखतीत '3 इडियट्स' वर काम सुरु झालं का? असा प्रश्न विचारता शरमन म्हणाला, "किती मज्जा येईल असं झालं तर, राजु सरांना आमच्या प्रेमाविषयी माहिती आहे आणि त्यामुळे ते चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहेत कारण त्यांना प्रेक्षकांना निराश करायचे नाही. सीक्वेलविषयी त्यांनी काही आयड्या माझ्यासोबत शेअर केल्या आहेत. पण काही महिन्यांनंतर जाणवलं की त्यावर काम करू शकत नाही. त्यांना सीक्वेल बनवायची इच्छा आहे. जेव्हा पण हे होईल तेव्हा काम करायला मज्जा येईल आणि प्रेक्षकांना देखील हे पाहायला मज्जा येईल." 


हेही वाचा : प्रत्येक चित्रपट हिट ठरल्यानंतर Kartik Aaryan ला भेट मिळते नवीन कार? कियाराचा खुलासा


दरम्यान, या आधी 3 Idiots ची संपूर्ण टीम ही एका जाहिरातीसाठी एकत्र आली होती. त्या जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला की लवकरच त्यांना सीक्वेल पाहायला मिळणार आहे. या जाहिरातीत आमिर खान, आर माधवन  आणि शरमन जोशी एक मुलाखत घेत असल्याचे दिसले होते. त्यावेळी त्यांनी '3 इडियट्स' च्या सीक्वेलवर हिंट देखील दिली होती. त्यांच्या या जाहिरातीसाठी करीना कपूर देखील त्यांना साथ देत होती. तिनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर प्रेक्षकांशी थोडी मस्ती करण्यासाठी एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती. तर '3 इडियट्स' मध्ये आमिर खान, आर माधवन, शरमन जोशीसोबत करीना कपूर देखील दिसली होती. सध्या राजकुमार हिरानी शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. हा चित्रपट यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.