राजेश खन्ना यांच्या `या` दोन चित्रपटांमध्ये शर्मिला टागोर होत्या प्रेग्नंट; सैफ आणि सोहाला देणार होत्या जन्म
Sharmila Tagore on Pregnancy : शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sharmila Tagore on Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्यासोबत खूप काम केलं. दोघांच्या केमिस्ट्रीनं सिल्वर स्क्रीनवर सगळ्यांचं लक्ष वेधलं. 80 च्या दशकात त्यांनी एकमेकांसोबत काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. राजेश खन्ना यांच्यासोबत दोन वेगवेगळ्या चित्रपटाचं शूटिंग करताना शर्मिला टागोर एकदा सैफ अली खान आणि एकदा सोहा अली खानच्यावेळी गर्भवती होत्या. याविषयी शर्मिसा टागोर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला.
शर्मिसा टागोर यांनी 'फ्री प्रेस जर्नल' ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं. 'अमर प्रेम' या त्यांच्या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की 'त्या या चित्रपटाचा भाग कशा झाल्या? त्यांनी सांगितलं की आराधना हा चित्रपट हिट झाल्यानंतर शक्ति सामंतनं मला अमर प्रेम या चित्रपटासाठी ऑफर दिली. मी हा चित्रपट करण्यासाठी खूप उस्ताही होते. कारण त्या चित्रपटाची पटकथा ही माझ्या भूमिकेच्या अवतीभोवती फिरत होती.'
शर्मिला टागोरनं सांगितलं की 'अमर प्रेम' या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या आधी राज कुमार यांना कास्ट करण्यात आलं होतं. 'मी राज कुमार यांच्यासोबत कधी काम केलं नव्हतं. फक्त वक्त चित्रपटात केलं होतं. पण त्यातही माझा त्यांच्यासोबत कोणताही सीन नव्हता. काका अर्थात राजेश खनन्ना ज्यांनी माझ्या आणि शक्ति सामंतसोबत आराधना या चित्रपटात काम केलं होतं. त्यांनी अमर प्रेम चित्रपटात काम करण्यावर जोर दिला आणि त्यामुळए राज कुमार यांची जागा त्यांनी घेतली.'
शर्मिला टागोर यांनी त्यांच्या 'अमर प्रेम' या चित्रपटाचं यश वाढण्याचं कारण आरडी बर्मन यांचं म्यूजिक आणि आनंद बख्शी यांचे लिरिक्स असल्याचं म्हटलं. त्यांनी सांगितलं की संगीत आणि लिरिक्स हे कोणत्याही पटकथेला पुढे घेऊन जाण्यास प्रचंड मदत होते. त्यावेळी चित्रपटात्या प्रीमियरला फील्ड मार्शल मानेकशॉ उपस्थित होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 1971 चं भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झालं.
हेही वाचा : 'ही पोरगी कोणाची?' अनुराग कश्यपच्या लेकीच्या लग्नात सर्वांच्या नजरा तिच्यावर
शर्मिला टागोर यांनी पुढे त्यांच्या प्रेग्नेंसीविषयी सांगितलं की 'काका आणि मी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. आम्ही एकत्र खूप चांगला वेळ व्यथित केला आहे. आराधना दरम्यान मी प्रेग्नंट होते आणि त्यावेळी सैफचा जन्म होणार होता. जेव्हा मी काका यांच्यासोबत छोटी बहू करत होते तेव्हा देखील मी प्रेग्नंट असून तेव्हा सोहाचा जन्म होणार होता. काका आणि माझ्यात अनेक मतभेद देखील होते. ते सेटवर खूप उशिरा यायचे आणि कॅमेऱ्यावर आमची प्रोफाईल एकसारखी होती. त्यामुळे जेव्हा आम्ही एका फ्रेममध्ये असायचो तेव्हा काका नेहमीच कॅमेरामनकडून त्यांची जी चांगली प्रोफाइल आहे ती शूट करून घेण्याचा प्रयत्न करायचे.'