Shashi Kapoor Birthday : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशि कपूर (Shashi Kapoor) हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते. शशि कपूर यांनी 60-70 चे दशक गाजवले होते. लोकप्रियता असली तरी देखील शशि कपूर यांना त्यांचे खासगी आयुष्य प्रायव्हेट ठेवायला आवडायचे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी ते जास्त बोलायचे नाही. शशि कपूर त्यांची पत्नी जेनिफर केंडलविषयी तर खूप कमी बोलायचे. आज 18 मार्च शशि कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांच्याविषयी काही जाणून घेऊया. (Shashi Kapoor Birthday Special)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशि कपूर यांनी वयाच्या 10 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘आग’ या चित्रपटातून त्यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. शशि कपूर हे पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांमध्ये सगळ्यात लहान होते. शशि कपूर त्यांच्या चॉकलेट बॉय लूक्ससाठी ओळखले जात होते. शशि कपूर यांनी 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Shashi Kapoor Wife)




हेही वाचा : Bhalchandra Kulkarni Death : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड



शशि कपूर हे रॉयल लाइफ जगायचे. पण एक काळ असा आला होता जेव्हा शशि कपूर यांनी प्रोड्युस केलेल सगळे चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. त्यांच्या अकाऊंटमधील सगळे पैसे संपले होते. त्यामुळे घर खर्चासाठी सुद्धा त्यांच्यांकडे पैसे नव्हते. खरंतर शशि कपूर यांच्यावर ही परिस्थिती अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा अजूबा हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आली होती. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांच्यावर खूप कर्ज झालं होतं. त्यांचे अकाऊंट पूर्णपणे खाली झाले होते. घर खर्चासाठी शशि कपूर यांनी त्यांची स्पोर्ट्स कार देखील विकली होती. त्या पैशातून त्यांनी घरासाठी आवश्यक वस्तू घेतल्या होत्या. तर त्यांची पत्नी जेनिफरनं त्यांचे सगळे दागिने देखील शशि कपूर यांना दिले.



याविषयी शशि कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरनं  (Kunal Kapoor) एका मुलाखतीत सांगितले होते. वडिलांनी घर खर्चासाठी स्पोर्ट्स कार विकल्यानंतर आई जेनिफरनं तिचे दागिने विकण्यास सुरुवात केली होती. पण या सगळ्या परिस्थितीतून ते लवकरच बाहेर पडले होते. दरम्यान, जेनिफर यांना काही दिवसांनंतर कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर 1984 साली जेनिफर यांचे निधन झाले. जेनिफर यांच्या निधनानं शशि कपूर यांना मोठा धक्काबसला होता. तर शशि कपूर यांचे 2017 साली निधन झाले.