`शाहरुख खानमुळे आर्यन होतोय टार्गेट` Shatrughan Sinha यांचं मोठं वक्तव्य
आर्यन खान जेव्हा मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अडकला तेव्हापासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई : आर्यन खान जेव्हा मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अडकला तेव्हापासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान, अनेक स्टार्सनीही शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचंही नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.
शाहरुखच्या मुलाला टारगेट केलं जात आहे
शत्रुघ्न सिंन्हा देखील शाहरुख खानच्या समर्थनात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत ते म्हणाले की, काही लोकं असं म्हणत आहेत की, हे सगळे शाहरुखच्या धर्मामुळे घडलं पण असं म्हणणं योग्य नाही. उलट, शाहरुख खानची प्रसिद्धी हे सगळ्यात मोठं कारण आहे. ज्यामुळे आर्यनला सगळ्यात जास्त टार्गेट केलं जात आहे. अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा अशी इतर अनेक नावं आहेत. त्यांच्याबद्दल कोणीही बोलत नाहीये.
दीपिकाचं नावही खूप गाजलं
एका मुलाखती दरम्यान शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, शेवटच्या वेळी जेव्हा ड्रग्स अँगल मुद्दा गाजत होता. तेव्हा दीपिका पदुकोणबद्दलही बरीच चर्चा झाली होती. त्यावेळीही इतर अनेक नावं त्यांच्याशी जोडली गेली होती. पण कोणीही त्यांच्याबद्दल बोलत नव्हतं. तसंच यावेळी देखील हा खेळ आर्यनसोबत खेळला जात आहेत. कारण तो शाहरुख खानचा मुलगा आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी स्टार्सबाबत हे सांगितलं
यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनीही या प्रकरणी सेलिब्रिटींच्या मौनाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बॉलिवूडमधील कोणीही अशा प्रकरणात बोललं तर त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात. अशी प्रकरणे अनेकवेळा घडली आहेत. लोकांच्या घराबाहेर निदर्शने झाली. याच कारणामुळे लोक अशा विषयात बोलणं टाळतात. खरं तर, आर्यन खानला NCBने 2 ऑक्टोबरच्या रात्री ड्रग्स पार्टी प्रकरणात पकडलं होतं. या प्रकरणात आर्यन खान व्यतिरिक्त अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचासह अनेकांना अटक करण्यात आलं आहे.