तू हुबेहुब रिना रॉयसारखी कशी काय दिसतेस? ...जेव्हा वडिलांच्या अफेअरबद्दल बोलली सोनाक्षी सिन्हा
Sonakshi Sinha Reena Roy: सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर पुन्हा एकदा शत्रुघ्न सिन्हा यांची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे. यावर सोनाक्षीने प्रथमच उत्तर दिलं आहे
Sonakshi Sinha Reena Roy: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे 23 जून रोजी लग्न पार पाडले. मात्र, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर अचानक तिचे वडिल आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे. सोनाक्षी हिचा चेहरा हुबेहुब रिना रॉय यांच्यासारखा दिसतो. त्यामुळं सोनाक्षी ही रिना रॉय यांची मुलगी असल्याच्या अफवांना उधाण आलं होतं. मात्र, एका मुलाखतीत सोनाक्षीने या सगळ्या चर्चांवर मौन सोडलं होतं. सोनाक्षीने वडिल शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा उघडपणे भाष्य केलं होतं.
शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. जवळपास सात वर्ष त्यांचे अफेअर सुरू होते. पूनम सिन्हा यांच्यासोबतच्या लग्न झाल्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांचे नाते तसंच होते. पूनम आणि शत्रुघ्न सिन्हा यांना जुळी मुलं झाल्यानंतर त्यांच्या व रिना रॉय यांच्या नात्यात दुरावा आला. रिना रॉय यांनी शत्रुघ्न यांना दोघीपैंकी एकीलाच निवडा असा पर्याय दिला. तेव्हा नाईलाजाने शत्रुघ्न यांनी रिना रॉय यांच्यासोबतचे नाते तोडले होते.
सोनाक्षी सिन्हाने दबंग चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांच्याबद्दल वावड्या उठू लागल्या. त्याला कारणीभूत ठरला तो सोनाक्षीचा चेहरा. सोनाक्षीचा चेहरा रिना रॉय यांच्यासोबत मिळता जुळता आहे. एकदा सोनाक्षीलाही याबाबत विचारणा करण्यात आली होती. वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरबद्दल विचारताच सोनाक्षीने खूप चांगल्या पद्धतीने ही हाताळला.
सोनाक्षीने उत्तर दिलं की, हे तेव्हा झालं जेव्हा माझा जन्मदेखील झाला नव्हता. मला याबाबत तेव्हा माहिती झालं जेव्हा मी मोठी होत होते. तेव्हा या गोष्टी मला समजायला लागल्या. पण मी तेव्हा माझ्या वडिलांना याबाबत जाब विचारु शकत नव्हती. हा त्यांचा भूतकाळ होता आणि प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. त्यामुळं मी त्याच्याबाबत जास्त विचार करत नाही आणि याकडे लक्षदेखील देत नाही. काही लोकांसाठी हा चर्चेता विषय असेल पण माझ्यासाठी हे माझे कुटुंब आहे.
सोनाक्षीने पुढे म्हटलं की, मी माझ्या आईसारखी दिसते. सोनाक्षीने स्पष्टीकरण दिल्यानंतर रीना रॉय यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की या चर्चा प्रचंड मनस्ताप देणाऱ्या आहेत. सोनाक्षी पूनम सिन्हा यांच्यासारखी दिसते, असंही रॉय यांनी म्हटलं होतं.