Shatrughan Sinha On  Sonakshi Sinha's Wedding : बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे त्यांची लेक सोनाक्षी सिन्हासाठी आनंदी आहेत. त्यांच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी चर्चेत होत्या. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी त्या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लेक सोनाक्षी आणि जावई झहीर इक्बालसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत जावयासाठी एक स्पेशल मेसेज लिहिला आहे. चला तर जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर आताच्या X अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. शत्रुघ्न यांनी त्यांच्या लेकीला आणि जावयाला शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभर मानले. त्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सोनाक्षी आणि झहीर हे पारंपारिक वेशात दिसत असून पुजारी मंत्रोच्चार करत आहेत. हा लग्ना संबंधीत व्हिडीओ आहे. एका व्हिडीओमध्ये दाखवण्या आलं आहे की कशा प्रकारे नवरी मुलीला पारंपारिक पद्धतीनं आणण्यात आलं. त्यानंतक संध्याकाळी मुंबईतील लोकप्रिय रेस्टॉरंट बास्टियनमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. 



फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की 'आमच्या खास दिवसाला आमच्यासोबत साजरा करण्यासाठी. आम्हाला प्रेम आणि शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांचे आभारी आहोत. 'शताब्दीचतलं लग्न'... आमची लाडकी मुलगी सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बालसोबत आयुष्याच्या एका नव्या सुंदर प्रवासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत आहेत.' 


हेही वाचा : सानियाशी लग्नाच्या चर्चेनंतर मोहम्मद शमीनं चाहत्यांना दिली गूड न्यूज! Video पोस्ट करत म्हणाला..


सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर ते 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले. या दोघांनी लग्नात आयव्हरी रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यानंतर रिसेप्शन पार्टीसाठी सोनाक्षीनं लाल आणि गोल्डन रंगाची साडी नेसली होती. तर झहीरनं लाल आणि पांढरा कुर्ता परिधान केला आहे. तर सोनाक्षीनं तिचा आणि झहीरचे लग्नातील फोटो शेअर करत कॅप्शन दिलं होतं की 'काय दिवस होता! आमचे सगळे मित्र, कुटुंह आणि टीमचं प्रेम, आनंद, उत्साह... असं सगळं काही होतं. हे पाहून असं वाटलं की प्रेमात असलेल्या कुटुंबाला काही देण्यासाठी ब्रम्हांड एकत्र आलं आहे, ज्याची तिनं नेहमी आशा केली होती. आम्हाला दोघांना एकमेकांची साथ मिळालं यासाठी आम्ही धन्य आहोत आणि देवाला आमची रक्षा करणं खूप आवडतं.'