मुंबई : कलाविश्वात अशा अनेक महिला आहेत, ज्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. 'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) ने देखील अनेक संकटांचा सामना केला आहे. शेफाली जरीवालाचं अभिनेता पराग त्यागीसोबत दुसरं लग्न आहे. शेफालीचं पहिलं लग्न मीत ब्रदर्समधील हरमीत सिंहसोबत (Harmeet Singh)झालं. 2004 साली विवाह बंधनात अडकलेलं हे जोडपं 2009 साली विभक्त झालं. दोघांमध्ये कायम वाद होत असल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर शेफालीने फार वर्षांपूर्वी झलेल्या हिंसाचाराबद्दल उघडपणे सांगितलं. सांगायचं झालं तर शेफालीने 'बिग बॉस 13'मध्ये पहिल्या पतीवर हिंसाचाराचे आरोप लावले. आता नुकताचं झालेल्या मुलाखतीमध्ये तिने सर्व घडला प्रकार सांगितला, 'तुमचं कौतुक केलं जात आहे की नाही. हे समजणं फार महत्त्वाचं आहे.'


शेफाली पुढे म्हणाली,'फक्त शारीरिक हिंसा असू शकतं नाही. मनसिक हिंसा देखील असू शकते. त्यामुळे तुम्ही फक्त दुःखी असता. मी आत्मनिर्भर असल्यामुळे स्वतःचा निर्णय स्वतःचं घेवू शकली. मी स्वतः कमवते. आपल्या देशात सर्वात मोठी भीती म्हणजे..लोकं काय म्हणतील? पण लोकांचा विचार करायाचा नाही, अशी घरची शिकवण..'



'तुला जे चांगलं वाटतं ते कर. म्हणून मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा निर्णय घेवू शकली.' असं शेफालीने मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर तिला परागसोबत कशी ओळख झाली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, 'मी तेव्हा एकटी होती आणि परागला भेटण्यासाठी प्लान केला. आम्ही एकमेकांना आवडतं होतो.'


'अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आम्हाला दोघांना आवडतात आणि काही गोष्टी दोघांमध्ये पूर्णपणे भिन्न आहेत.' काही दिवसांपूर्वी शेफाली आणि पराग मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. शेफालीने मालदीवमधील काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यामध्ये ती परागसोबत अत्यंत आनंदी दिसत होती.