मुंबई : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर चाहत्यांची आवडती #SidNaaz ची जोडी तुटली. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. बिग बॉसच्या घरात, त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांचा हात सोडला नाही. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाज गिल वाईट रीतीने तुटताना दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या प्रमोशनला दिसली
अलीकडेच, शहनाज गिल पुन्हा एकदा तिच्या कामावर परतली आहे पण तिचा चेहरा पूर्वीसारखा हसताना दिसत नाही. आजकाल ती तिच्या आगामी हौसला रख या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे आणि समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये तिचे डोळे ओले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर नकली स्माईल दिसत आहे. इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिची अशी अवस्था पाहून चाहते खूप चिंतेत दिसत आहेत.



कुठे हरवली शहनाजची स्माईल?
सोशल मीडियावर असे अनेक ट्विट करण्यात आले आहेत ज्यात दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांच्यासोबत चित्रपटाचे प्रमोशन करणारी शहनाज गिल खूप निराश दिसत आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आहे, पण व्हिडीओ पाहून स्पष्टपणे अंदाज लावला जाऊ शकतो की ही स्माईली खरी नाही तर ते एक दिखावा आहे. शहनाज गिलची स्माईल परत आणण्यासाठी चाहते कमेंटबॉक्समध्ये खूप प्रयत्न करत आहेत.