`Sidnaaz`वर शहनाजने सोडलं मौन, चाहत्यांना दिलासा देणारी बातमी
`बिग बॉस 13` शो दरम्यान तिची मैत्री या सिझनचा विजेता सिद्धार्थ शुक्लासोबत झाली.
मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल यां दिवसांत आपल्या करिअरच्या नव्या उचींना स्पर्श करत आहे. बिग बॉस 13 शो दरम्यान तिची मैत्री या सिझनचा विजेता सिद्धार्थ शुक्लासोबत झाली. यानंतर या दोघांच्या जवळिकतेच्या बातम्या समोर येऊ लागल्या.
शोमध्ये शहनाज आणि सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांना आवडली आणि दोघांना #सिदनाजचा हॅशटॅग दिला. बिग बॉस शो संपल्यानंतर या दोघांना एकत्र अनेक प्रोजेक्ट ऑफर करण्यात आले होते. या दोघांचंही नातं आजही अबाधित आहे.
अलीकडेच दोघांशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, त्यानंतर सिद्धार्थ आणि शहनाजच्या चाहत्यांची निराशा होत आहे. अखेर एका मुलाखतीत शहनाझने त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीवर मौन तोडलं आहे. बोलता-बोलता शहनाज म्हणाली की, सिदनाज अजूनही एक गोष्ट आहे आणि हे नातं शोचं नाही तर ते खऱ्या आयुष्यातदेखील आहे.
पुढे शहनाज म्हणाली की, आम्ही दोघं एक चांगलं नातं शेअर करतो आणि हेच यामगचं कारण आहे की, लोकं या नात्याचं नाव जोडतात. जसं की सिद्धार्थने माझ्यावर प्रेम केलं. हे माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्या दोघांच्या भावना ऐकमेकांसाठी एकसारख्या आहेत. सिद्धार्थसोबत माझं नातं खूप वेगळं आहे. तो मला माझ्या परिवारासारखा आहे.