Shehnaaz Gill : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलचे लाखो चाहते आहेत. शहनाज गिलच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहनाज गिल ही सध्या 'थॅंक्यू फॉर कमिंग' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. शहनाज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर त्यानिमित्तानं ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते. नुकतीत शहनाजनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं रिव्हिलिंग ड्रेस परिधान केल्यानं तिला ट्रोल करण्यात आले. मात्र, शहनाज शांत बसली नाही. तिनं सोशल मीडियावर ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. 


रिया कपूरनं सांगितलं तर ते पण कपडे काढून टाकू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाजनं टोरेन्टोला फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. त्यानिमित्तानं 'थॅंक्यू फॉर कमिंग' या चित्रपटाची कास्ट तिथे पोहोचली होती. त्यावेळी शहनाजनं रिव्हिलींग ड्रेस परिधान केला होता. तिचा हा रिव्हिलींग ड्रेस नेटकऱ्यांच्या काही पसंतीस उतरला नाही. अशात त्यांनी शहनाजला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावरून शहनाजला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. तर, यावेळी उत्तर देत शहनाज म्हणाली, जर रिया कपूर म्हणाली तर हे पण काढून टाकू. आम्ही स्टायलिंगमध्ये थोडा पण कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही इंटरनॅशन्ल डिझायनर्सचे कपडे परिधान करत आहोत. त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते, यासाठी आमची कधी पासून प्रतिक्षा करत होतो. आमचे फोटो हे इंटरनॅशन्ल डिझायनर्स शेअर करत आहेत, यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे. शहनाजचा या कार्यक्रमातील व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलानं शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शहनाजच्या वक्तव्यावर भूमि पेडनेकरची अशी रिअॅक्शन?


शहनाजनं केलेल्या कमेंचवर भूमि पेडनेकर, कुशा कपिला, शिबानी बेदी आणि डॉली सिंगनं हूटिंग दिल्या. सोशल मीडियावर शहनाजचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी शहनाजनं दिलेल्या या उत्तराची स्तुती केली आहे. 


हेही वाचा : ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवाती कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले, ' फक्त 13 दिवसांसाठी...'


क्यूट की खतरनाक नक्की शहनाज कशी आहे? 


याआधी शहनाजनं आणखी एका मुलाखतीत तिच्या हेटर्सविषयी एक वक्तव्य केलं होतं. तेव्हा ती म्हणाली की माझं खूप चाहते आहेत, पण त्याच्यासोबत हेटर्स आणि ट्रोलर्स देखील आहेत. लोकांना वाटतं की शहनाज जे पण काही करते ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे, पण हे सगळं फेक आहे. त्यांनी माझ्यासारखी पर्सनॅलिटी पाहिलेली नाही. मी खूप वेगळी आहे आणि लोकांना हे पचवत नाही की मी इतकी क्यूट कशी. दादा मी क्यूटचं आहे. जेव्हा मी खतरनाक आहे तेव्हा मी खतरनाक आहे.