Chandra Grahan 2024: चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरे का बंद असतात?

चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरे बंद ठेवण्यचाची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे देखील दिली जातात. जाणून घ्या सविस्तर

| Sep 12, 2024, 17:55 PM IST
1/6

चंद्रग्रहण

हिंदू धर्मात चंद्रग्रहण हा अशुभ काळ मानला जातो. ग्रहण काळात राहू-केतू ग्रहांचा प्रभाव सर्वाधिक वाढतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते. 

2/6

पूजा करू नये

चंद्रग्रहणाच्या काळात देवांची शक्ती कमी होते. त्यामुळे यावेळी पूजा करण्यास मनाई असते.   

3/6

दरवाजे बंद

चंद्रग्रहणाच्या आधी सुतक कालावधी सुरु होतो. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा केली जात नाही. 

4/6

नैसर्गिक घटना

चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो आणि चंद्रग्रहण होते. 

5/6

मूर्तींवर परिणाम

प्राचीन काळी ऋषींचा असा विश्वास होता की ग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे मूर्तींवर परिणाम होऊ शकतो. 

6/6

पूजा करण्यास बंदी

मंदिरांना नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी ग्रहणकाळात देवी-देवतांची मंदिरे बंद करून पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.