Shehnaaz Gill Says She Want's Boyfriend : पंजाबची कतरिना कैफ (Panjab's Katrina Kaif) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही 'बिग बॉस 13' मधून प्रसिद्धीझोतात आली. शहनाजनं तिच्या साध्या आणि सोज्वळ स्वभावानं प्रेक्षकांची मने जिंकली. या शोमध्ये शहनाज ही दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) प्रेमात पडली होती. शहनाज आणि सिद्धार्थची केमस्ट्री आणि लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांची केमिस्ट्री ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होती. त्या दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत गेले. त्यांचे चाहते त्यांना सिडनाझ (Sid Naaz)  या नावाने ओळखायचे. 
 
दरम्यान, अचानक सिद्धार्थचे निधन झाले. 2 सप्टेंबर 2021  रोजी सिद्धार्थनं अखेरचा श्वास घेतला आणि त्यानं सगळ्यांचा निरोप घेतला. सिद्धार्थचे निधान हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते. सिद्धार्थनं शहनाझच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतल्याचे देखील म्हटले जाते. शहनाजना या दु: खातून बाहेर येण्यासाठी बराच काळ लागला. तेव्हापासून शहनाज गिल ही सिंगल आहे. मात्र, शहनाजनं केलेल्या एका वक्तव्यावरून ती लाइफ पार्टनरच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शहनाजनं हा खुलासा शाहिदसोबत (Shahid Kapoor) चर्चा करताना सांगितला आहे. 'फर्जी' (Farzi) या वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, शहनाजनं तिचा भाऊ शहबाजची आणि शाहिदची ओळख करून दिली. इतकंच काय तर तिनं सांगितलं की शहबाज हा शाहिदचा मोठा चाहता आहे. यावेळी शाहिदनं शहनाजला तिच्यात आणि भावात किती फरक आहे असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देत मी माझ्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे असं शहनाजनं सांगितलं. 


हेही वाचा : Divorce च्या चर्चा असतानाच, Actress नं दुसऱ्या पतीसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडीओ


पुढे शाहिद शहनाजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतो आणि बोलतो की तिला शहबाजसारखे अनेक भाऊ देवो. त्यावर रुसलेली शहनाज तोंड मुरडत बोलते की "मी का भाऊ बनवू?" शाहिद म्हणतो, “तुला गरज आहे. असे तीन-चार हट्टे कट्टे तुझा शेजारी उभे राहणं गरजेचे आहेत. त्यावर लगेच उत्तर देत शहनाज म्हणाली तिला भावाची नाही तर बॉयफ्रेंडची गरज आहे. मी त्याच्यासाठी बाउन्सर घेईन. मला बॉयफ्रेंड हवा आहे, भावाचे काय करू. दरम्यान, पुढे शहनाजनं तिच्या भावाविषयी सांगितले आणि म्हणाली त्यानं त्याच्या मैत्रिणींना सांगितले की तो शाहिदसोबत शूट करणार आहे. हे ऐकताच शाहिदनं शहनाजच्या भावाला कॉल केला.